शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

08 Dec 2023 16:48:07
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
loss of farmers शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अशा मागणीचे निवेदन हिमायतनगर भारतीय जनता पार्टीतर्फे तहसिलदारांना देण्यात आले. तालुक्यात अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या शेतातील रब्बी हंगामातील हरभरा, कापूस, तूर, गहू ,ज्वारी व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
 
 
loss of farmers
 
शेतकर्‍यावर वातावरणाच्या बदलामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे तत्काळ पंचनामे करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेेवार, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात हिमायतनगर येथील शेतकर्‍यांनी तहसीलदारांकडे केली आहे.loss of farmers निवेदनात तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे तत्काळ पंचनामे करावे, नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांना हरभरा पिकांची बियाणे मोफत देण्यात यावे व इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
यावेळी गजानन तुप्तेवार, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, गजानन चायल, सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण ठाकूर, चिटणीस दुर्गेश मंडोजवार, अधिवक्ता संघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड, दत्ता शिराणे, लक्ष्मण ढानके, हिमायतनगर शहराध्यक्ष वीपूल दंडेवाड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे, शहराध्यक्ष शीतल सेवनकर, बालाजी तोटेवाड, ओमकार सेवनकर, सोशल मीडियाचे विशाल शिंदे, गजानन पिंपळे, तानाजी सोळंकेसह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे असं‘य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सं‘येन उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0