तभा वृत्तसेवा
अमरावती,
Daryapur firing case : दर्यापूर येथे गुरूवारी रात्री झालेले गोळीबार प्रकरण लग्न संबंधातून घडले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून फरार झालेल्या अन्य तिघांचा शोध सुरू आहे. जखमी झालेल्या युवती व तिच्या वडीलांवर उपचार सुरू असल्याची माहिती आज 8 डिसेंबरला पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक विक्रम साळी यांनी पत्रकारांना दिली.
महेश जालमसिंग हरदे, श्रध्दा हरेल, अजय चंद्रकांत पवार सर्व रा. मलकापुर असे Daryapur firing case अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ताच्याकडून गुन्ह्यातत वापरलेली बी.एम.डब्ल्यु. क्र.एमएच 2 ए.जे.6119, इनोव्हा क्रं. एमएच 19 सीएफ 2113 ही दोन चारचाकी वाहने व पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आकाश चव्हाण, पुरूषोत्तम राठोड, धनंजय दिधोरकर असे फरार आरोपींची नावे आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. पोलिस अधिक्षक म्हणाले, आरोपी महेश हरदे व जखमी तरूणीची सोशल मिडीयावर ओळख झाली होती. महेश बंगलोरमध्ये प्रापर्टी ब्रोकर म्हणनू काम करीत होता. दोघांची मैत्री वाढत गेली.
महेश बंगलोरवरून अमरावती येथे वास्तव्यास आला. Daryapur firing case तो काही दिवसांपूर्वी पिडीत तरूणीच्या अंजनगाव येथील घरी गेला होता. तरूणीच्या आई-वडीलाला त्याने तुमच्या मुलीसोबत लग्न केले आहे. तिला माझे सोबत पाठवा. विवाह संबंधाचे कागदपत्रे सुध्दा त्याने दाखविली होती. परंतु, पिडीत तरूणीने आई-वडीलास ही बाब खोटी आहे व कागदपत्रे बनावट असल्याचे सांगितले. महेशला त्यांनी घरून जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पिडीत तरूणी व तीच्या आई- वडीलांच्या नावाने गाडगे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या चौकशीसाठीच पिडीत तरूणी ही आई, वडील व परिचयातील गजानन हरपुळे यांच्यासोबत गुरूवारी अमरावतीला आली होती.
चौकशी आटोपल्यावर ते अंजनगावकडे निघाले असता Daryapur firing case आरोपीतांनी दुचाकी व चाराचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करून दर्यापुर नजीक त्यांच्यावर चालत्या वाहनातून गोळया झाडल्या. त्यात तरूणीच्या मानेला गोळी लागली. गजानन हरपुळे जखमी झाले. घटनेनंतर आरोपी उपरोक्त नमुद वाहनातून भातकुली मार्गे अमरावती शहर, कारंजा लाड असे पळून गेले. पोलिसांनी त्वरीत सतर्कता दाखवून सर्व आरोपींना कारंजा लाड येथून ताब्यात घेतले. पुढील तपास दर्यापूर पोलिस करीत आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्ष किरण वानखडे, संतोष टाले, स.पो.नि. सचिन पवार, पो.उप.नि. नितीन चुलपार, संजय शिंदे, सागर हटवार यांच्यासह सर्व पोलिस अमंलदारांनी केली.