तभा वृत्तसेवा
अमरावती,
V. D. Savarkar : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे पुत्र व कर्नाटक सरकार मधील मंत्री प्रियांक खडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभद्र भाषेत टिप्पणी करून अपमान केला होता. त्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी राजकमल चौकात त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी केली.
भाजपा प्रदेश चिटणीस जयंत डेहनकर म्हणाले, काँग्रेस अध्यक्षाचा मुलगा अशा प्रकारे V. D. Savarkar देशभक्तांचा, महाराष्ट्राचा अपमान करतो. हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मान्य आहे का? त्याचे सहयोगी उध्दव ठाकरे व संजय राऊत हे सहमत आहेत का? हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले. या आंदोलनात प्रदेश महिला उपाध्यक्षा लता देशमुख, सरचिटणीस विवेक कलोती, सतीश करेसिया, निलेश देशमुख, गंगा खारकर, शीतल वाघमारे, मिलिंद बांबल, कुणाल टिकले, हेमंत श्रीवास्तव, बादल कुळकर्णी, हरीश साऊरकर, प्रणित सोनी, सुधीर बोपुलकर, वैभव बगणे, शुभम वैष्णव, तुषार चौधरी, कौशिक अग्रवाल, प्रवीण रुद्रकार यांच्यासह अन्य उपस्थित होते.