मुंबई,
WPL Auction भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आगामी २०२४ महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) WPL Auction लिलावासाठी सज्ज आहे. मुंबईतील जिओ वल्र्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ९ डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे.
WPL Auction लिलावासाठी एकूण १६५ खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यात १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी ५६ कॅप्ड भारतीय खेळाडू आहेत, तर ६५ अनकॅप्ड खेळाडू आहेत. लिलाव ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास संपणार आहे. लिलावात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायण्ट्स व युपी वॉरिओज हे पाच संघ सहभागी होत आहेत. मल्लिका सागर डब्ल्यूपीएल लिलावासाठी अधिकृत लिलावकर्ता म्हणून काम करेल. या लिलावासाठी कोणत्या संघाला किती जागा व किती पर्स उपलब्ध आहे, याचा तपशील असा- मुंबई इंडियन्स : जागा-५, पर्स- २.१ कोटी. दिल्ली कॅपिटल्स : जागा- ३, पर्स- २.२५ कोटी. युपी वॉरिओज : जागा- ५, पर्स- ४ कोटी. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : जागा- ७, पर्स- ३.३५ कोटी व गुजरात जायण्ट्स : जागा-१०, पर्स- ५.९५.