चिखली,
Muk Morcha : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह शेखावत (गोगामेडी) यांची करण्यात आलेल्या हत्येचा चिखली येथे राजपूत बांधवांनी मुक मोर्चा काढून जाहीर निषेध केला व तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येण्याची मागणी केली. दि. ५ डिसेंबर रोजी भर दिवसा घरामध्ये प्रवेश करून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो स्व सुखदेवसिंह जी शेखावत् (गोगमेडी) यांची जयपूर, राजस्थान येथे राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळे संविधाना ची सुद्या हत्या झालेली आहे. या संदर्भात दि. ६ डिसेंबर रोजी चिखली शहर व परिसरातील सकल राजपूत हिंदू समाज संघटना एकत्र येऊन जाहीर निषेध केला असून आरोपीना कठोरात कठोर शिक्षा देण्या बाबत तीव्र भावना यक्त केल्या होत्या.
या घटनेच्या तीव्र निषेध म्हणून दि. ८ डिसेंबर रोजी समाजबांधव वाणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन दुपारी एक वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी या निषेध सभेत संतप्त भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आणि चिखली शहरातून बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जयस्तंभ चौक राजा टावर चिंच परिसर या मार्गातून मूक मोर्चा काढून नायब तहसीलदार वीर यांना निवेदन दिले तसेच पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांना सुद्धा निवेदन दिले या निवेदनामध्ये राजपूत हिंदू समाज यांच्या वतीने विनंती करण्यात येते की स्व सुखदेवसिंह जी शेखावत (गोगामेडी) यांच्या झालेल्या निघून हत्ये बाबत अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्या बाबत आपण शासनाना शिफारस करावी अशी विनंती.करण्यात आली आहे.
यावेळी या निषेध मोर्चामध्ये डॉ प्रतापसिंग राजपूत, शिवदास राजपूत, समाधान गाडेकर डॉ प्रताप परिहार, सुभाष राजपूत, बिदेसिंग इंगळे ,अनिल चौहान, ऋषिकेश सोळंकी, रामदास मोरे गजानन मोरे, दत्तु सुरडकर, राम सुरडकर,योगेश राजपूत, गजानन सुरडकर ,अड संजीव सदार, गणेश सोळंकी, स्वप्नील सुरडकर, सुनिलकुमार सुरडकर, धनंजय इंगळे, आत्माराम इंगळे, श्रीकांत सोळंकी, रविंद्र पवार, सुरेंद्र ठाकूर, विनायक सरनाईक, सुभाष देव्हडे, नितीन राजपूत, संजय गाडेकर, विजय गाडेकर, प्रणव गाडेकर ,गजानन परिहार, संदिप जाधव, ईश्वर चंदेल, बळीराम हाडे, नंदु हाडे, प्रकाश जाधव, काशीनाथ राजपूत, किशोर सोळंकी, सिध्देश्वर इंगळे, सोनु परिहार, समाधान सुगदेव गाडेकर ,अमोल परिहार , अमोल हाडे, राजेश सोळंकी शिनदास मोरे , संदिप मोरे, योगेश सोळंकी, भगवान सोळंके, जनार्दन परिहार,रंगनाथ परिहार, विष्णु सोळंकी ,विजय ठाकूर, सुधाकर सुरडकर, गजानन परिहार, पांडुरंग परिहार शंकर सुरडकर गजानन सोळंकी अनिल सोळंकी विशाल सोळंकी गोविंदा सोळंकी यांच्यासह मोठ्या प्रमाणात राजपूत समाज बांधव उपस्थित होते.