ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या कर्णधारपदी अ‍ॅलिसा हिली

09 Dec 2023 17:54:32
- ताहलिया मॅकग्रा संघाची उपकर्णधार
- 21 डिसेंबरपासून भारतात पहिला दौरा

मेलबर्न, 
महान क्रिकेटपटू मेग लॅनिंग हिच्या निवृत्तीनंतर Alyssa Healy अ‍ॅलिसा हिली हिची ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची सर्व फॉर्मेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस अ‍ॅलिसाच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया महिला संघाचा भारतात पहिला विदेश दौरा असेल. या दौर्‍यात अ‍ॅलिसा आपल्या नवीन भूमिकेला सुरुवात करणार आहे. 21 डिसेंबरपासून मुंबईत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.
 

Alisa hili 
 
Alyssa Healy अ‍ॅलिसा हिलीने यापूर्वी जूनपासून इंग्लंड, आयर्लंड व वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सचे नेतृत्व करणार्‍या अष्टपैलू ताहलिया मॅकग्राला संघाची उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 33 वर्षीय अ‍ॅलिसा हिलीने यापूर्वी मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संघाची उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि तिच्याकडे या कामाचा 14 वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारल्याचा मला सन्मान वाटतो. आमच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ऑस्ट्रेलियाचा ध्वज फडकत ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घोेण्याची आमची तयारी आहे, असे नवनियुक्त कर्णधार अ‍ॅलिसा हिली म्हणाली.
 
 
गत काही महिन्यांत मला खेळाडूंचा भरपूर पाठिंबा मिळाला. तो तसाच राहावा. मला संघाचे नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल खरोखर खूप आनंद झाला, असे ती म्हणाली. माझा दृष्टीकोन पूर्वी होता तसाच राहील, परंतु मी या भूमिकेवर माझा स्वतःचा ठसा उमटवीन. आम्हाला मिळालेले यश टिकवून ठेवण्यासाठी मी शक्यतो सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे, असेही ती म्हणाली.
ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार म्हणून अ‍ॅलिसाची पहिली मोठी जबाबदारी पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणारा टी-20 विश्वचषक असेल.
 
 
मॅकग्रा म्हणाला की
उपकर्णधारपदी नियुक्ती करणे हा विशेषाधिकार आहे. Alyssa Healy अ‍ॅलिसा हिलीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. अ‍ॅलिसा व मी बराच काळ एकत्र खेळलो आहोत व आम्हाला आमच्या संबंधित नेतृत्व शैली चांगल्या प्रकारे माहित आहे, असे उपकर्णधार ताहलिया मॅकग्रा म्हणाली.
भारत दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : डार्सी ब्राउन, लॉरेन चीटल (केवळ कसोटी), हीदर ग्रॅहम, अ‍ॅशले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस (केवळ टी-20), अ‍ॅलिसा हिली, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम (सर्व स्वरूप).
Powered By Sangraha 9.0