नैसर्गिक आपत्तीचा लाभ मिळण्याकरिता शेतकर्‍यांचे आमदार डॉ. उईकेंना निवेदन

    दिनांक :09-Dec-2023
Total Views |
राळेगाव, 
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून राळेगाव तालुक्यातील वरध मंडळातील गावे वगळण्यात आल्यामुळे या परिस्थितीची पाहणी करून या गावांना समाविष्ट करून दुष्काळी मदत मिळण्याकरिता विविध गावांतील शेतकर्‍यांनी आपल्या मागणीचे निवेदन आमदार Dr. Ashok Uike डॉ. अशोक उईके यांना दिले. वरध मंडळामधील खैरगाव (कासार), चोंदी, सखी खुर्द, सराटी, लोणी, बंदर, वरध, सावरखेड, पळसकुंड, उमरविहीर, सुभानहेटी, घुबडहेटी, खेमकुंड व इतर गावांतील शेतकर्‍यांचे सततच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ, नाल्याला लागून असलेले शेत खरडून गेले.
 
 
Ashok-uike
 
शेतकर्‍यांनी पीकविमा काढला त्याचासुद्धा लाभ अद्यापपर्यंत मिळाला नाही. गेल्या पाच वर्षांपासून वरध मंडळातील शेतकर्‍यांना अद्याप कुठलाही लाभ मिळालेला नसल्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. बाजूच्याच झाडगाव मंडळात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाची परिपूर्ण मदत मिळत आहे. परंतु वरधमध्ये कोणत्याही गावाला शासनाची मदत पाच वर्षांपासून मदत पोचलेली नाही. त्यामुळे शासनाने येथील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन किंवा पाहणी करून सरसकट दुष्काळ घोषित करावा, अन्यथा सर्कलमधील सर्व शेतकर्‍यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देणारे निवेदन शेतकर्‍यांनी आमदार Dr. Ashok Uike डॉ. अशोक उईके यांना दिले. निवेदन देताना सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर कोवे, भीमराव पुरके, पांडुरंग कोवे, पुंडलिक आत्राम, रघुनाथ मसराम, सुखदेव घोडे, चंद्रकांत केवटे, पुरुषोत्तम केवटे, लीलाधर केवटे, भाऊराव जुमनाके, नीळकंठ केवटे, हरिभाऊ सोनवणे, विलास ढाले, पद्माकर जुमनाके, पांडुरंग दुडकोहळे, अभिमान मेश्राम यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.