संस्कार भारती वाङ्मय पुरस्कार जाहीर ; हे आहेत विजेते !

Sanskar Bharati-Nagpur २०२१-२२ साठी पुरस्कार !

    दिनांक :09-Dec-2023
Total Views |
नागपूर,
 
 
Sanskar Bharati-Nagpur रंगमंच व ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत विदर्भ संस्कार भारतीच्या वतीने वर्ष २०२१ व २०२२ करिता दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' डॉ. श्यामा घोणसे (पुणे), दत्ता जोशी (छत्रपती संभाजी नगर), डॉ. राजेंद्र नाईकवाडे (नागपूर) आणि किरण डोंगरदिवे (मेहकर जि. बुलढाणा) यांना घोषित झाला आहे. Sanskar Bharati-Nagpur शाल, श्रीफळ, स्मृतिचिह्न आणि रोख 15,000 रुपये असे स्वरूप असलेला, दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार यावेळीदेखील विभागून देण्यात येत आहे.Sanskar Bharati-Nagpur
 
 

Sanskar Bharati-Nagpur 
 
 
Sanskar Bharati-Nagpur डॉ. श्यामा घोणसे लिखित 'भारतीय संत आणि सामाजिक समरसता' (वैचारिक, भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे), दत्ता जोशी लिखित 'तुम्ही बी घडा ना' (प्रेरक, पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान, जालना), Sanskar Bharati-Nagpur डॉ. राजेंद्र नाईकवाडे लिखित 'शब्दनिष्ठांची मांदियाळी' (विमर्शात्मक वाङ्मयीन व्यक्तिचित्रे, लाखे प्रकाशन, नागपूर) आणि किरण शिवहर डोंगरदिवे लिखित 'काव्यप्रदेशातील स्त्री' (समीक्षात्मक, अथर्व पब्लिशन) या पुस्तकांची निवड गत दोन वर्षीच्या पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. डॉ. कल्पना व्यवहारे उमरेडच्या कला -वाणिज्य महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक होत्या. व्यासंगी, वैचारिक व ललित लेखक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या सुकन्या वैशाली देशपांडे व दीपाली एकताटे यांनी दिलेल्या देणगीतून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. Sanskar Bharati-Nagpur यापूर्वी शेषराव मोरे, अदिती जोगळेकर- हर्डीकर, सुरेंद्र दरेकर, माधव भांडारी, देवीदास पोटे व अहमद शेख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
डॉ. श्यामा घोणसे पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होत्या. 'वीरशैवांचे मराठी- हिंदी वाङ्मय : एक अभ्यास' विषयावर त्यांचा प्रबंध आहे. Sanskar Bharati-Nagpur महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष, समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास मंडळाच्या नियामक मंडळ सदस्य, शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधन समितीच्या सचिव राहिल्या आहेत. 'भारतीय संत आणि सामाजिक समरसता' या ग्रंथामध्ये संतांच्या चमत्कारांपेक्षा त्यांनी जातिभेद निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आणि इस्लामविरुद्ध उभे केलेले जनमानस याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. Sanskar Bharati-Nagpur केरळ ते काश्मीर आणि आसाम पर्यंतच्या संतांचे यासंदर्भातील अपूर्व कार्य या ग्रंथात नोंदविलेले आहे.
दत्ता जाेशी हे छत्रपती संभाजीनगर स्थित मुक्त पत्रकार आहेत. तीन दशके प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात कार्यरत दत्ता जोशी उद्याेजकीय प्रेरक लेखनाच्या निमित्ताने त्यांची राज्यभर भ्रमण करतात. त्यांनी एक हजारहून अधिक उद्याेजकांच्या प्रेरक कथा समाजासमाेर मांडल्या. त्यांची आजवर एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. Sanskar Bharati-Nagpur 'तुम्ही बी घडा ना' या पुस्तकात महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यात एकेकाळी अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या आणि आता विविध क्षेत्रांतून याेगदान देणाऱ्या २५ कार्यकर्त्यांचा वेध घेण्यात आला आहे. कार्यकर्ता व्यावसायिक झाला तरी त्याची राष्ट्रीय विचारांची व समर्पणाची भावना कायम राहते, हेच यातून अधाेरेखित करण्याचा प्रयत्न आहे.
प्रा. डॉ. राजेंद्र गोविंदराव नाईकवाडे हे श्री बिंझाणी नगर महाविद्यालय, नागपूर येथे मराठी विभागात कार्यरत आहेत. त्यांची आजवर समीक्षा विषयक 6 पुस्तके प्रकाशित असून 14 पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. Sanskar Bharati-Nagpur महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित मराठी विद्यापीठ समितीचे सदस्य, भाषा सल्लागार समिती सदस्य, विद्यापीठांतील अभ्यासक्रम समिती इत्यादी विविध समित्यांवर कार्यरत डाॅ. नाईकवाडे समरसता साहित्य परिषदेसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आहेत. 'शब्दनिष्ठांची मांदियाळी' या ग्रंथातून मराठी साहित्यात मानदंड ठरलेल्या निवडक लेखकांच्या वाड्मयीन व्यक्तिमत्त्वाचा आणि साहित्याचा समग्र वेध घेतलेला आहे. Sanskar Bharati-Nagpur विमर्शात्मक वाड्मयीन व्यक्तिचित्रांचे स्वरूप लाभलेला आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या प्रकाशात विविध साहित्यिकांच्या समग्र साहित्याची मूलगामी चिकित्सा करणारा हा ग्रंथ मराठी समीक्षेच्या क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीने उठून दिसतो.
 
किरण शिवहर डोंगरदिवे हे नव्वदी नंतच्या साहित्यिक पिढीचे प्रतिनिधी असून त्यांचे काव्य, ललित, वैचारिक लेखनासह कथा आणि समीक्षणाच्या क्षेत्रात भरीव कार्य असून अनेक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Sanskar Bharati-Nagpur 
'काव्यप्रदेशातील स्त्री' ह्या समीक्षा संग्रहात 76 कवींच्या कवितेतील फक्त स्त्री विषयक जाणिवावर लेखन करत त्यांनी संबंधित कवी, त्यांचा काव्य अवकाश, तत्कालीन सामाजिक स्थितीत स्त्रियांना मिळणारी वागणूक आणि स्त्री विषयक समाज मन आपल्या लेखनातून अधोरेखित केले असून असा प्रयोग मराठीतच नव्हे तर इतर भाषेतही झाल्याचे आढळून येत नाही.Sanskar Bharati-Nagpur पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे विदर्भ संस्कार भारतीच्या अध्यक्ष सूरमणी प्रा. कमल भोंडे, कार्याध्यक्ष सुधाकर अंबुसकर, महामंत्री विवेक कवठेकर व अ. भा. साहित्य विधा संयोजक आशुतोष अडोणी यांनी अभिनंदन केले आहे.