नवी दिल्ली,
South Africa T20 series भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी घोट्याच्या दुखण्यामुळे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T201 मालिकेतून बाहेर पडला आहे. लुंगी एनगिडी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहील.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 डिसेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज लुंगी न्गिडी डाव्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील लुंगी एनगिडीचा सहभाग संशयास्पद मानला जात आहे. लुंगी एनगिडीला दुखापत झाल्यानंतर वेगवान गोलंदाज बुरॉन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. South Africa T20 series याशिवाय ओटनील बार्टमन, नॅंद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी आणि लिझाद विल्यम्स हे देखील संघात आहेत. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला विश्रांती देण्यात आली आहे. लुंगी एनगिडीला वगळण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कमकुवत झाल्याचे मानले जात आहे.
भारत दौऱ्याची सुरुवात डर्बनपासून होणार आहे. दुसरा T20 सामना Gkeberha येथे आणि तिसरा T20 सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल. त्यानंतर भारत 17 ते 21 डिसेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर दोन कसोटी सामने खेळवले जातील, पहिली 26 डिसेंबरला आणि दुसरी 3 जानेवारीला.