पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते फ्लड लाईटचे लोकार्पण

09 Dec 2023 22:41:23
वर्धा, 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा संकुल समिती वर्धा व नगर परिषद वर्धा द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे सौर उर्जेवरील फ्लड लाईट टावरचे लोकार्पण 11 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री Sudhir Mungantiwar सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोड राहतील. स्वागताध्यक्ष आमदार डॉ़ पंकज भोयर राहतील.
 
 
Sudhir Mungantiwar
 
खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर आडबाले, आ. रणजित कांबळे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, वर्धा नपचे मुख्याधिकारी राजेश भगत उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याला क्रिडाप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे़
 
 
Sudhir Mungantiwar : इंडियन आयडल फेम शनमुख प्रिया यांच्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे. सिंधी प्रीमियम लीगच्या वतीने या कार्यकमाचे आयोजन केले आहे. शनमुख प्रिया हिच्या सोबतच स्थानिक कलावंत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिक व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक व सिंधी प्रीमियम लीगच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0