"दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती"

01 Feb 2023 14:24:53
नागपूर,  
आपल्या नागपूर शेजारी Bappa नयनरम्य परीसरात बाप्पाला यायची इच्छा झाली. त्याचा तो आला आणि वर्षभरापुर्वी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. गुरूवार 2 फेब्रुवारीला बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षेपुर्ती होतेय.
fg
 
हिंगणा Bappa तालुक्यातील "झिल्पी" तलाव परिसरात "सिद्धीविनायकाच अत्यंत देखणं मंदीर हा नागपुरकर आणि आजुबाजुच्या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान ठरलय. मनाला शांती लाभावं असं हे मंदीर. बाप्पाला बघताच आपसुकच आपण नतमस्तक होतो.
उद्या मंदिरात 1.30 ते 4.30 पर्यंत गणेश याग, सायंकाळी 5 ते 6 भजन संध्या आणि तत्पश्चात महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
सर्व भक्तांनी ह्या ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन "सिद्धी विनायक ट्रस्ट" चे अध्यक्ष महापौर . संदीप जोशी यांनी केले आहे.
सौजन्य:संपर्क मित्र-ज्योत्स्ना साने कुऱ्हेकर
Powered By Sangraha 9.0