अपार्टमेंटमध्ये आग लागल्याने 14 ठार

    01-Feb-2023
Total Views |
धनबाद,
apartment fire झारखंडमधील धनबाद शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागली. त्यात दोन डझनहून अधिक कुटुंबे अडकली होती. अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या मदतीने यातील बहुतांश जणांना बाहेर काढण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत 18 जखमींना पाटीलपुत्र नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते, तर 13 मृतदेह एसएनएमसीएचमध्ये पाठवण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
 
aaga
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुबोध श्रीवास्तव यांच्या मुलीचे लग्न झाले होते. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बाहेरूनही लोक आले होते. कुटुंबासह अपार्टमेंटमधील अनेक लोक लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. दरम्यान, खालच्या मजल्यावर राहणाऱ्या पंकज अग्रवाल यांच्या घरातील कार्पेटवर जळणारा दिवा पडला. काही वेळातच कार्पेटला आग लागली. आग हळूहळू पसरली आणि वरच्या मजल्यालाही आग लागली. apartment fire याठिकाणी लोकांची संख्या जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाली आणि आगीमुळे तीन मुले, एक पुरुष आणि दहा महिलांना जीव गमवावा लागला. या अपघातात दोन डझनहून अधिक लोक भाजले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  आशीर्वाद टॉवर हे निवासी तसेच व्यावसायिक केंद्र आहे. येथे सुमारे 70 ते 80 फ्लॅट्स आहेत. 12 मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. तिथून काही अंतरावर असलेल्या हाजरा रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता.