आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूरचा गुमराह ७ एप्रिलला!

01 Feb 2023 14:02:22
मुंबई, 
'बावल' चित्रपटाच्या Mrinal Thakur प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याबद्दल माहिती दिली. याच दिवशी आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. व्हीएफएक्सच्या तयारीला होत असलेल्या विलंबामुळे बावलची तारीख वाढवण्यात आली आहे. ज्याचा फायदा आदित्य रॉय कपूरच्या चित्रपटाला झाला. आता गुमराह 7 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 
dfd
 
गुमराहमध्ये आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर Mrinal Thakur यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट असून यामध्ये आदित्य रॉय कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. याआधी आदित्यने कोणत्याही चित्रपटात दुहेरी भूमिका केली नव्हती.  काही काळापूर्वी या चित्रपटाविषयी बोलताना आदित्य रॉय कपूर म्हणाला, 'अशा मनोरंजक कथेचा भाग बनून मी प्रेरित आणि उत्साहित आहे. मूळ चित्रपट नक्कीच मनोरंजक होता आणि त्याने माझ्यावर कायमची छाप सोडली. एक अभिनेता असणं, दुहेरी भूमिका साकारणं ही दुप्पट मजा आणि आव्हानही आहे आणि त्यासाठी मी नक्कीच तयार आहे! हा उत्कंठावर्धक थ्रिलर लवकरच पडद्यावर आणण्यासाठी मी भूषणजी, मुराद भाई आणि वर्धन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
गुमराह हा तमिळ चित्रपट थडमचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अरुण विजय आणि विद्या प्रदीप मुख्य भूमिकेत दिसले होते. गुमराहची निर्मिती भूषण कुमारची टी-सीरीज आणि मुराद कैदानी यांच्या सिने-१ द्वारे केली जात आहे. तर निर्मात्यांनी 7 एप्रिल ही चित्रपटाची रिलीज डेट निश्चित केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0