अंजलीची मैत्रिण निधीला चौकशी नेले

    01-Feb-2023
Total Views |
 NSHYS
 
नवी दिल्ली,
Anjali's friend दिल्ली पोलिसांनी कांजवाला प्रकरणातील सहावा आरोपी आणि कारचा मालक आशुतोष यालाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजलीला आशुतोषच्या गाडीखाली ओढले गेले. प्राथमिक तपासात पोलिसांना असे समजले आहे की, अपघातानंतर लगेचच सर्व आरोपींनी कार मालक आशुतोष यांनाही घटनेची माहिती दिली होती. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून, त्यात सर्व आरोपी कारमधून खाली उतरल्यानंतर ऑटोमधून पळून गेल्याचे दिसत आहे. कारमधून उतरल्यानंतर आरोपींनी तात्काळ ऑटोमधून पळ काढला. तिथे ऑटो आधीच उभा होता. दरम्यान, ताजी बातमी अशी आहे की, या संपूर्ण घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या निधीची दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. Anjali's friend निधी आणि अंजली मैत्रिणी होत्या. दोघे 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करून स्कूटीवर एकत्र परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून फरार होत असताना पाच आरोपींपैकी एक मनोज मित्तल याने खाली वाकून कारच्या मागून पाहिले होते. असे असतानाही ते सर्वजण आशुतोषची गाडी सोडून पळून गेले.