राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला मंजुरी...

    01-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली,
Budget निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सकाळी 9.30 वाजता दिल्लीत राष्ट्रपतींची भेट घेऊन अर्थसंकल्पाला मंजुरी घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी सकाळी 11 वाजता देशाचा 5वा आणि 75वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री संसद भवनात पोहोचले आहेत.
  
jrt
अर्थ राज्यमंत्री भागवत कृष्णा यांनी Budget अर्थसंकल्प सर्वांच्या अपेक्षांवर खरा ठरेल, असे सांगून सकारात्मक संकेत दिले आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ पाहायला मिळाली. निर्मला सीतारामन गेल्या 4 बजेटमध्ये काहीतरी नवीन करत आहेत. मग ते ब्रीफकेस लेजर असो, पेपर लेस बजेट असो किंवा सर्वात लांब बजेट भाषण असो. यंदा काय विशेष घडणार याकडे लक्ष लागले आहे...