सामुदायिक आरोग्य अधिकारी आज संपावर

    01-Feb-2023
Total Views |
 adhikari
 
मुंबई, 
Community health officers महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नियुक्ती केलेले सामुदायिक आरोग्य अधिकारी कायम सरकारी नोकरीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी संपावर जाणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये कामाचा ताण कमी करणे, वेळेवर वेतन देणे आणि राज्य सरकारकडून विमा काढणे यांचा समावेश आहे. Community health officers अशी मागणी सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शासनाकडे केली.  सामुदायिक आरोग्य अधिकारी (सीएचओ) ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करतात. ते सध्या कंत्राटावर काम करत आहे. सूत्रांनी सांगितले की, त्यांच्या कराराचे नूतनीकरण झाले असले तरी आता त्यांना राज्य सरकारचे कायमस्वरूपी कर्मचारी करण्याची मागणी सीएचओने केली आहे. एका सरकारी डॉक्टरांनी सांगितले की, एक दिवसाच्या संपामुळे रुग्णांच्या प्राथमिक तपासणीवर परिणाम होईल.