प्रतापनगर शिक्षण संस्थेचा सुवर्ण जयंती महोत्सव समापन

01 Feb 2023 14:44:11
नागपूर, 
प्रतापनगर शिक्षण संस्था (Education Institute) सुवर्ण जयंती महोत्सव निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत दि. ३१-०१-२०२३ राजी तृतीय पुष्प परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांचे आर्शिवचनाने गुंफण्यात आले. त्यांनी सद्यस्थितीत आमची धर्मदृष्टी व परिवार संस्था या विषयावर विविध उदाहरणे व दाखले देत सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे सर्व उपस्थित भक्त भारावून गेलेत.
 
Education Institute
 
प्रारंभी परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, संस्था अध्यक्ष गिरीश देशमुख, उपाध्यक्ष शंकर पहाडे, सचिव अनुपमा नाफडे, व उपस्थित संचालक, मुख्याध्यापक मंजुश्री टिल्लू व श्रावण सुरकर यांनी दिप प्रज्वलन करून उद्घाटन केले.यावेळी संस्था संचालक प्रशांत वैद्य, श्रीराम महांकाळीवार , प्रशांत चौधरी,शाम काळे उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक अध्यक्ष गिरीश देशमुख, महाराजांचा परिचय संचालक श्रीराम महांकाळीवार, सुत्रसंचलन वंदना काळे तर आभार संचालक श्याम काळे यांनी मानलेत.याप्रसंगी माजी महापौर राजेंद्र लोखंडे,माजी नगरसेवक कैलास चुटे, विवेक तरासे, गोपाल बोहरे तसेच चारुदत्त बोकारे नविन मालेवर, प्रफुल्ल वाघमारे उपस्थित होते. महाराजांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने व आर्शिवचनाने तीन दिवसीय व्याख्यानमालेची समाप्ती करण्यात आली. संस्थेच्या (Education Institute) सुवर्ण जयंती महोत्सव आयोजित कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी खुप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
       सौजन्य : शंकर पहाडे (संपर्क मित्र)
 
Powered By Sangraha 9.0