दृष्टी विज्ञानवादी बुद्धी व्यवहारवादी आणि मन अध्यात्मवादी ठेवा-नरेंद्राचार्य महाराज

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

    01-Feb-2023
Total Views |
बुलढाणा, 
विज्ञानाने क्रांती केली आहे. तरी सुद्धा Narendracharya  अध्यात्मा शिवाय मनःशांती मिळत नाही आपली दृष्टी विज्ञानवादी ठेवा, बुद्धी व्यवहारवादी असू द्या, मन मात्र अध्यात्मावादी ठेवा. या त्रीसूत्रीने जीवन जगल्यास नक्कीच आपण समाधानाने जीवन जगू शकतो. तसेच तुम्ही जगा, दुसर्‍यांना जगवा या दिव्य संदेशानुसार समाजातील दुःख पीडितांची मदत व सेवा केल्यास नक्कीच भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल तीच खरी भगवंताची सेवा आहे. असे मौलिक विचार उपस्थित भक्तगणांना ऑनलाईन व्दारे प्रवचन देत असताना जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज यांनी सांगितले.
 

fhb 
 
जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज Narendracharya  संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत विभूषीत जगदगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक 28 जानेवारी रोजी संपन्न झाला. सकाळी 9 वाजता जगदगुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे जयस्तंभ चौक पासुन भव्य दिव्य मिरवणूक द्वारे लहाने लेआउट, चिंचोले चौक बुलढाणा येथे आगमण झाले.हा आध्यात्मिक सोहळा अतिशय उत्साह मध्ये संपन्न झाला. तसेच संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत समाजामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल निराधार महिलांना मोफत घरघंटी वाटप करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी आ. संजय गायकवाड, मुख्यधिकारी गणेश पांडे, मुख्याधिकारी आकाश सुरळकर, दिनकर काळे रविकांत काळवाघे, शरद मस्के दत्तात्रय लहाने मनोज दांडगे , उदय रानभरे विश्वस्त संजीवन ट्रस्ट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सामाजिक उपक्रम संपन्न करण्यात आला. जिल्ह्यांमधून हजारो भाविक दर्शनासाठी व प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.
 
 
तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचा दर्शनाचा लाभ घेतला. आ. संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत असताना जगदगुरु श्रींच्या कार्याचा व कार्यकर्त्यांचा गुणगौरव केला कौतुक केले समाजाला दिशा देणारे संत हे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. भाविकांसाठी कार्यक्रमा मध्ये महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश खडोळ, विष्णू वायाळ, संजय हराळ, रामेश्वर निंभोरे, प्रदीप सोनोने, दीपक चिंचोले, राजू सणांसे, जि. महिला अध्यक्ष गीतांजली सणांसे, मंगेश मोटे, वाळके , खडोळ, सोनवणे निंभोरे रिंढे , गिरे ज्ञानेश्वर दसरे, . अनिल जवंजाल, रमेश गुजर राजेश पिंगळे, प्रवीण कराळे, अमोल टेंभे, सर्व जिल्हा समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.