अन्...निर्मला सीतारमण म्हणाल्या, सॉरी…

01 Feb 2023 13:24:18
नवी दिल्ली, 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण Nirmala Sitharaman यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बोलताना अचानक त्या चुकल्या आणि संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यामागे कारणही तसेच होते. मात्र तत्काळ त्यांनी आपली चूक सुधारत पुढचे भाषण सुरु केले. झाले असे की, वाहनांच्या धोरणावर बोलताना निर्मला सीतारमण यांना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ असा उच्चार करायचा होता. मात्र, भाषणात त्या ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असं म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांच्याही ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी ‘सॉरी’ म्हणत आपली चूक दुरुस्त केली. 

bdnhdy
Nirmala Sitharaman निर्मला सीतारमण म्हणाल्या, सॉरी. मला माहिती आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दरम्यान 2020-21 च्या अर्थसंकल्पात जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरणाचा उल्लेख होता. आता ही जुनी सरकारी वाहनं भंगारात काढण्यासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत आहे. राज्य सरकारंही जुनी सरकारी वाहनं आणि जुन्या रुग्णवाहिका बदलण्यासाठी सहभाग घेईल, असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.
Powered By Sangraha 9.0