पाकिस्तान बनला दहशतवाद्यांचा गड!

01 Feb 2023 09:28:03
इस्लामाबाद,
terrorists पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीमध्ये नमाज पठणादरम्यान झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी ढिगाऱ्यातून आणखी काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि आत्मघाती हल्लेखोर पेशावर शहरातील सर्वात सुरक्षित भागात कसा प्रवेश करू शकला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या नमाजाच्या वेळी हल्लेखोर पुढच्या रांगेत उभा होता तेव्हा त्याने  स्फोट केला. स्फोटामुळे मशिदीचे छत कोसळले आणि ढिगाऱ्याखाली उपासक गाडले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोर पुढच्या रांगेत होता आणि त्याने स्वत:ला उडवले, त्यामुळे मशिदीचे छत उपासकांवर कोसळले.
 
 
bnshys
 
लेडी रीडिंग हॉस्पिटलचे (एलआरएच) प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले की, 100 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. असीम म्हणाले की, 53 जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत, तर सात जणांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. बहुतेक जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असेही त्यांनी सांगितले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश पोलिसांचा समावेश आहे. मृतांमध्ये किमान एक पोलीस उपअधीक्षक, पाच उपनिरीक्षक आणि मशिदीचे इमाम मौलाना साहिबजादा नूरुल अमीन यांचा समावेश आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखले जाते, या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये terrorists अफगाणिस्तानात मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुरासानी यांच्या बदला हल्ल्याचा हा एक भाग असल्याचे सांगितले.  पेशावर पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले.  
 
 
Powered By Sangraha 9.0