समृद्ध...समर्थ...संपन्न भारत !

01 Feb 2023 14:41:21
- हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणार, समाजाची स्वप्ने पूर्ण करणार
 
नवी दिल्ली, 
अमृत काळातील म्हणजे 2023-24 चा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा विराट संकल्प पूर्ण करण्यासाठी भक्कम असा आर्थिक पाया घालेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींनी 'समृद्ध...समर्थ...संपन्न भारत' असा नवा मंत्र दिला आहे. वंचितांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प समाजाची स्वप्ने पूर्ण करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अमृत ​​काळातील पहिला अर्थसंकल्प विकसित भारताच्या उभारणीचा भक्कम पाया घालणार आहे. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह गरीब, मध्यमवर्गीय, महत्त्वाकांक्षी समाजाची स्वप्ने पूर्ण करणारा आहे. परंपरेने स्वतःच्या हातांनी देशासाठी कष्ट करणारे 'विश्वकर्मा' या देशाचे निर्माते आहेत. पहिल्यांदाच 'विश्वकर्मा'च्या प्रशिक्षण आणि सहाय्याशी संबंधित योजना अर्थसंकल्पात आणण्यात आली आहे.

India Budget
 
पीएम विकास करोडो 'विश्वकर्मा'च्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. खेड्यापासून शहरांपर्यंत राहणाऱ्या आपल्या महिलांच्या राहणीमानात बदल घडवून आणण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली गेली आहेत, ती आता अधिक जोमाने पुढे नेली जातील. या (India Budget) अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष बचत योजनाही सुरू करण्यात येत आहे. हा अर्थसंकल्प सहकारी संस्थांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवेल. नवीन प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
 
 

‘‘अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा विराट संकल्प पूर्ण करण्यासाठी भक्कम असा आर्थिक पाया घालेल. हा अर्थसंकल्प समाजातील वंचितांना प्राधान्य देणारा तसेच आकांक्षी समाज, गाव, गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्ग यांच्या स्वप्नांची पूर्तता करणारा आहे. सहकारबाबत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींमुळे ग‘ामीण विकासाला चालना मिळणार आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच जगातील सर्वात मोठी अन्न भंडार योजना तयार करण्यात आली आहे. प्राथमिक सहकारी संस्थांचे देशातील जाळे मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पतून अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.’’
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 
 
Powered By Sangraha 9.0