धूम्रपान महाग...अर्थसंकल्पात सिगारेटवरील करात 16 टक्क्यांनी वाढ

    01-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बुधवारी संसदेत 2023 चा अर्थसंकल्प (Budget Cigarette Tax) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पूर्ण अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी सादर केला. अर्थसंकल्प येताच नव्या अर्थसंकल्पात आतापासून सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशावर लक्षणीय परिणाम होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सरकारने सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढवली असून, त्यानंतर आता सिगारेटवर 16 टक्के कर भरणे बंधनकारक असणार आहे.

Budget Cigarette Tax
 
या घोषणेमुळे भारतीय (Budget Cigarette Tax) सिगारेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सिगारेटसोबतच सोने, प्लॅटिनम, डायमंड आदींसह इतर अनेक गोष्टींवर सरकारने कर वाढवला आहे. अशा परिस्थितीत आता लवकरच सिगारेटच्या किमती वाढू शकतात. याशिवाय सरकारने काही गोष्टींवरील कस्टम ड्युटी कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सिगारेटवरील 16 टक्के शुल्क वाढवण्यात आले आहे. या (Budget Cigarette Tax) अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 7 मुख्य प्राधान्यक्रमांची यादी केली आहे. ज्यामध्ये हरित विकास, पायाभूत सुविधा, युवा शक्ती, नवीन शक्यता उघडणे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे, आर्थिक क्षेत्र आणि सर्वसमावेशक वाढ यांचा समावेश आहे.