तापमानवाढीस पर्यटन जबाबदार !

Tourism in India प्रदूषित पाण्याच्या मात्रेत वाढ

    01-Feb-2023
Total Views |
प्रासंगिक  
- विनोद हांडे
 
Tourism in India पर्यटन हा शब्द जरी लहान असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. जसे धार्मिक स्थळांना भेटी, ऐतिहासिक स्थळांना भेटी, थंड प्रदेशातील भागांचा प्रवास, सागरी किना-यांना भेटी, डोंगराळ प्रदेशांचा प्रवास इत्यादी पर्यटनाचे भाग. Tourism in India आपल्या रोजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढून आराम करायला किंवा रिलॅक्स व्हायला किंवा ज्या भागात आपण जातो त्या भागातील संस्कृती, तिथले जीवन, हवामान, खानपानाच्या पद्धती जाणून घेणे, हा त्या प्रवासामागचा हेतू. समुद्र किना-याला भेटींचा उद्देश हा जलक्रीडेचाच असतो. Tourism in India भारत देश महान आहे. इथे जंगल आहेत, पहाड आहेत, नद्या आहेत, थंड हवेचे प्रदेश आहेत, बर्फाचे प्रदेश आहेत, ऐतिहासिक स्थळे आहेत, ऐतिहासिक प्रतिष्ठा असलेली शहरे आहेत. काय नाही आहे! प्रत्येक राज्याची आपली विशेष ओळख आणि विशेषता आहे. Tourism in India म्हणूनच आपण भारताला इनक्रेडिबल भारत किंवा अतुल्य भारत असे म्हणतो. Tourism in India पर्यटन हा लोकांचा आणि शासनाचा आवडता विभाग!
 

tour 
 
पर्यटकांचा उद्देश हा मनोरंजनाचा किंवा रिलॅक्स होण्याचा असतो तर शासनाचा रोजगार निर्मिती आणि पैसे कमविण्याचा असतो. Tourism in India लोकांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता आणि त्याचा समाजावर पडण-या परिणामाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतात २५ जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून आपण साजरा करतो. तसेच २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. Tourism in India राष्ट्रीय पर्यटन क्षेत्राव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रांना पण हल्ली महत्त्व आले आहे. पर्यटकांना सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती, त्यातून देशाकरिता मिळणारा पैसा, पर्यटन क्षेत्राचा विकास, रस्ते बांधणे, रेल्वेस्टेशन उभारणे, गरज भासल्यास विमानतळ बांधणे अशी शासनातर्फे अनेक कामे केली जातात. पर्यटनामुळे त्या भागाचा आर्थिक विकास व रोजगार निर्मिती होत असल्यामुळे बहुतांश विकसित देश पर्यटनाला प्राधान्य देतात. पण पर्यटकांची गर्दी वाढू लागली की त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होऊ लागतात. Tourism in India कचरा, घनकचरा, सांडपाणी अशा उपद्रवी वस्तूंची वाढ होऊन तिची विल्हेवाट लावणे स्थानिक प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जाते. कचरा सडून दुर्गंध पसरवितो आणि सांडपाणी जवळच्या नदीत किंवा तलावात सोडले जाते. Tourism in India कारण त्यांच्याकडे घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोई उपलब्ध नसतात.
 
 
Tourism in India पर्यटकांच्या संख्येच्या वाढीमुळे स्थानिक क्षेत्राच्या नैसर्गिक संसाधनावर ताण पडतो, जिथे आधीच त्या क्षेत्रात त्या वस्तू दुर्मिळ असतात. पर्यटनाला अधिक प्रोत्साहन मिळत असल्यामुळे वरील स्थिती भारताच्या पर्यटनाच्या ठिकाणी नव्हे तर जागतिक स्तरावर चिंतेचे कारण झाले आहे. पर्यटनातून धनप्राप्ती हाच एक उद्देश प्रशासनासमोर आहे. Tourism in India दरवर्षी १.४ अब्जाहून अधिक पर्यटक त्यांच्या गंतव्यस्थानी येतात. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला ४५ पर्यटक. १९५० मध्ये २५ दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटक आले होते. १९७० मध्ये ही संख्या झाली १६६ दशलक्ष आणि १९९० पर्यंत ती वाढून झाली होती ४३५ दशलक्ष. १९९०-२०१८ पर्यंत ही संख्या तिपटीने वाढून झाली १४४२ अब्ज. आणि २०३० पर्यंत ही संख्या १.८ अब्जापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. Tourism in India आपल्याला जरी पर्यटनामुळे आनंद मिळत असला तरी त्याचे नकारात्मक परिणाम पर्यावरणावर पडत असतात. पर्यटनामुळे पर्यावरणावर होत असलेले विपरीत परिणाम हे भारताकरिताच नव्हे, तर विकसित देशांकरिताही चिंतेचे कारण आहे.
 
 
Tourism in India वाढत्या पर्यटकसंख्येमुळे स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा -हास, तसेच प्रदूषणात वाढ, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि धोक्यात असलेल्या प्रजातींवर अधिक दबाव येऊ शकतो, ज्याच्यावर पर्यटन अवलंबून असते. पर्यटकांच्या सोईंकरिता हॉटेल बांधण्यात येतात, साहजिकच रूम आजकाल ए. सी. असतात. एका हॉटेलचे चार आणि चारचे चाळीस केव्हा होतात कळतच नाही. बहुतांश खोल्या ए. सी. असल्यामुळे पर्यटक मजेत असतात, पण त्याचवेळेस ते ए. सी. ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्ग करीत असतात. म्हणजेच त्या भागातील तापमानवाढीस जबाबदार ठरतात. Tourism in India पर्यटन म्हणजे दळणवळण आणि वाहतूक आलीच. वाहतुकीचा पण हरितगृह वायू उत्सर्जनात वाटा असतो. जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात पर्यटनाचा वाटा ५ टक्क्यांहून अधिक आहे. यातील ९० टक्के वाटा वाहतुकीचा असतो. २०३० पर्यंत, २०१६ च्या तुलनेत पर्यटनातून कर्ब-वायूच्या उत्सर्जनात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच हवामान बदलामध्ये पर्यटनाचा आणि पर्यटकांचा सहभाग आहे. Tourism in India पर्यटनामध्ये पर्यटक पाण्याचा अतिवापर करीत असल्यामुळे पाण्याचा गैरवापर अधिक होतो व पाण्याचे रूपांतर सांडपाण्यात होते. ज्या पर्यटनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता आधीच कमी असते त्याठिकाणी भूजलावर अधिक ताण पडतो. Tourism in India प्रदूषित पाण्याच्या मात्रेत प्रचंड वाढ होत असल्यामुळे पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. पर्यटनाच्या अधिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सांडपाण्याचे प्रदूषणही वाढते.
 
 
पर्यटनासाठी स्वतःच्या कारचा उपयोग हाही हवेच्या प्रदूषणास हातभार लावतो. कोविड-१९ नंतर तर स्वतःच्या कारने प्रवास करणाèया लोकांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. Tourism in India भारतातील दहा प्रमुख शहरांपैकी नऊ शहरे वायुप्रदूषित आहेत, असे डब्ल्यूएचओच्या अहवालात आहे. वायुप्रदूषण हा मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे असे तज्ज्ञ सांगतात. स्पेनमधील स्थानिक लोकांनी वाढत्या पर्यटकांच्या गर्दीला कंटाळून होणा-या नुकसानाकडे बघता पर्यटनाविरुद्ध आवाज उठवला आहे. Tourism in India स्थानिकांपेक्षा पर्यटकांची संख्याच जास्त. २०१६ ला स्पेनची लोकसंख्या होती ४६ मिलियन पण त्यावर्षी ७६ मिलियन पर्यटकांनी स्पेनला भेटी दिल्या. Tourism in India याचा विपरीत परिणाम त्यांच्या जीडीपीवर आणि उपलब्ध संसाधनावर होत असल्यामुळे त्यांनी पर्यटकांविरुद्ध बंड पुकारले. Tourism Kills The City and Tourist You are The Terroristsअशी भित्तिफलके लावण्यात आली. पैसा, कमाई हाच आयोजकांचा हेतू. पर्यावरणाशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही. हरितगृह वायूचे उत्सर्जन याच गतीने सुरू राहिल्यास २१०० पर्यंत जागतिक तापमान ५ अंश पर्यंत वाढू शकते असाही अंदाज आहे. पर्यटनाच्या विकासासाठी शासनाला पर्यटकांना अनेक सुविधा द्याव्या लागतात. Tourism in India लहान हॉटेलपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत. गाड्या पार्किंगचा पण प्रश्न उद्भवतो. जागा अपुरी पडायला लागते. मग जंगलतोड आलीच. प्रत्येक सेकंदाला आपण एका फुटबॉल मैदानाएवढे जंगल गमावतो असे अभ्यासक सांगतात. जंगलतोडीमुळे वृक्षाच्छादनाचे नुकसान झाल्यामुळे ग्रहावर अनेक नकारात्मक परिणाम होतात, नैसर्गिक अधिवासाचा नाश आणि प्रजाती नष्ट होतात.Tourism in India
 
 
पर्यटक हा आहाराविषयी अधिक बेपर्वा असतो आणि अशा वर्तनामुळे अन्नाची नासाडी होते. अन्न नासाडी हे तापमान वृद्धीचे जनक आहे हे वारंवार तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. Tourism in India अन्न नासाडीमुळे स्थानिक पर्यटन भागात अन्न उपलब्धतेवर पण ताण पडतो. समुद्र किनारपट्टीवर लावलेल्या कृत्रिम दिव्यांमुळे नवीन अंडी उबवलेली कासवांची पिले गोंधळून जातात आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने जातात. लहान कासवांमध्ये प्रकाशाचे अनुसरण करण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे त्यांचा जीवनप्रवास सुरू होतो. निसर्गात पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब समुद्रकिना-यावर सर्वात तेजस्वी बिंदू असतो. Tourism in India आजकाल किनारी लावलेले कृत्रिम दिवे रात्री अधिक चमकतात आणि सहजपणे हे लहान कासव चुकीच्या दिशेने प्रवास करतात आणि बरेचदा त्यांना जीव गमवावा लागतो. जलपर्यटन-जहाजे आपण त्यांना क्रुझ म्हणतो ते पण सर्वाधिक प्रदूषण करतात. क्रुझला तरंगणारी शहरेही म्हणतात. ते खोल पाण्यात अतिरिक्त आवाज करीत असल्यामुळे आवाजाशी संवेदनशील असलेल्या जलचरांना स्थांनांतर व्हायला भाग पाडतात. Tourism in India इतकेच नव्हे तर या तरंगणा-या शहरांतून पर्यटकांमुळे निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी सरळ पाण्यात सोडण्यात येते. शिवाय ही महाकाय जहाजे जीवाश्म इंधनाचा वापर करत असल्यामुळे निघणा-या कर्बवायूच्या माध्यमाने प्रदूषण पसरवितात. म्हणजेच ग्लोबल वार्मिंगमधे योगदान देतात.
 
 
वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार पर्यटनातील ७५ टक्के कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनासाठी पर्यटक वापरत असलेले हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतूक जबाबदार आहेत, जे पर्यटकांचे मुख्य प्रवासाचे साधन आहे. Tourism in India या उत्सर्जनात हवाई प्रवास पहिल्या क्रमांकावर आहे तर कार दुस-या क्रमांकावर. पर्यटकांच्या सोईंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आयोजक उत्सुक असतात, त्यात गरम पाणी, ए. सी., खाण्याचे नवनवीन पदार्थ, मनोरंजन सुविधा इत्यादी. हे फक्त कार्बन डायऑक्साइडच उत्सर्ग करत नाही तर मिथेन आणि नायट्रेटस ऑक्साइडसारखे अतितीव्र हरितग्रह वायू उत्सर्ग करतात जे हवामान बदलीस कारणीभूत असतात. Tourism in India हवामान बदलमध्ये पर्यटन आणि पर्यटकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे मानायला हरकत नाही. भारत हा विकसनशील देश असल्यामुळे पर्यटन विस्ताराचा दर ८ टक्क्यांच्या जवळपास आहे. सद्य:स्थितीत पर्यटन क्षेत्र अनियंत्रित असल्यामुळे त्याचे संभावित विपरीत परिणाम देशावर आणि जागतिक तापमान वाढीवर प्रचंड दबाव आणू शकतात. Tourism in India विशेषतः जलचक्रावर. पर्यटनामुळे नैसर्गिक क्षेत्रांना पण धोका निर्माण होऊ शकतो कारण त्या भागांचे आर्थिकचक्र हे पर्यटनावरच अवलंबून असते. Tourism in India म्हणून शाश्वत पर्यटन पर्यायाला प्राधान्य आणि धोरण गरजेचे आहे कारण पर्यटनाचे फायदे आणि संभाव्य धोके दोन्ही आहेत. जोशीमठ हे त्याचे ताजे उदाहरण !
९४२३६७७७९५