तभा वृत्तसेवा
मारेगाव,
रबी पिके समाधानकारक असताना Wild animals रोही, डुक्कर आदी वन्यप्राणी यांच्या हैदोसाने या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्रस्त शेतकरी वनविभागाकडे करीत आहे.
कधी ओला दुष्काळ Wild animals तर कधी कोरडा दुष्काळ या पावसाच्या अनियमिततेचा सामना करीत असलेल्या बर्याच शेतकर्यांनी कर्ज काढून आपली शेती उभी केली. मारेगाव तालुक्यात खरिपाच्या उत्पादनात घट झाली गहू, चणा, रबी पिके डोलू लागली असताना तालुक्यातील मार्डी परिसरात फिस्की जंगल व दापोरा जंगल क्षेत्र असल्याने रोही, डुकर, तसेच अन्य वन्यप्राणी मार्डी, बामरडा, चोपण, मजरा, गाडेगाव, वडगाव, किन्हाळा, बोदाड, केगाव, तुकापुर, खैरगाव, चिंचमंडळ, दापोरा व अन्य गावातील शेतमालाची उधळण करीत आहे.
या वन्यप्राण्याच्या हैदोसाने Wild animals शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने शेतकर्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. याही परिस्थितीत शेतकरी कसाबसा उभा असताना वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे रोही व डुक्कर यांचे कळप शेतमालाची नासधूस करीत आहे. याबरोबरच रानडुक्कर व इतर हिंस्त्र वन्यप्राणी यांचे शेतकर्यांवरील हल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जखमी शेतकर्यांना आर्थिक मोबदला मिळणे दुरापास्त झाले आहे. वनविभाकडून शेतकर्यांना झालेल्या या नुकसानीपोटी आर्थिक मदत दिली जाते. शेतकर्यांना ही आर्थिक मदतीची रक्कम एका महिन्यात संबंधित व्यक्ती किंवा शेतकरी पशुपालक किंवा त्याच्या नातलगांना देणे अपेक्षित आहे. मात्र, आज हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असतानाही त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम मागील दीड वर्षीत शेतकर्यांना मिळाली नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.