करदात्यांना दिलासा मिळणार?

    01-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
taxpayers get relief आजच्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळू शकतो. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. कारण, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत अर्थमंत्री या अर्थसंकल्पात दीर्घकाळापासून कायम असलेल्या आयकर स्लॅबवर मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. नऊ वर्षांपासून स्लॅबमध्ये इन्कम टॅक्स झालेला नाही. गेल्या वेळी 2014 मध्ये आयकर सूट मर्यादा वाढवण्यात आली होती.
 
 
fgfdgt6y
आता 2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.नोकरी व्यवसायापासून ते व्यापारी वर्गापर्यंत सर्वांनाच अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे. या नऊ वर्षांत लोकांचे खर्च वाढले, उत्पन्न वाढले पण आयकराची व्याप्ती तशीच राहिली. taxpayers get relief महागाईमुळे गेल्या अनेक वर्षात जनतेचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत आयकरात कोणतीही सवलत दिलेली नाही. अशा परिस्थितीत करदात्यांना नवीन कर प्रणाली अंतर्गत अडीच लाखांची आयकर सूट मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे. सध्या लोकांना 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या पगारावर 5% आणि 5 ते 7.5 लाखांच्या पगारावर 20% कर भरावा लागतो.