रोजगार वाढणार...सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटी रुपयांची योजना !
01 Feb 2023 11:59:31
नवी दिल्ली,
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (budget 23-24) यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. रोजगार निर्मिती लक्षात घेऊन सरकारने भांडवली खर्चात वाढ केली आहे.
सरकारने आपली भांडवली गुंतवणूक 33 टक्क्यांनी वाढवून 10 लाख कोटी रुपये (budget 23-24) करण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम देशातील रस्ते, महामार्ग ते रेल्वे आणि विमानतळांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा सरकारने अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणूक वाढवली आहे. हे देशाच्या जीडीपीच्या 3.3 टक्के इतके आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेने सभागृहात मोदी-मोदीच्या घोषणांनी गुंजले. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेली ही अर्थसंकल्पीय तरतूद 2019-20 च्या तुलनेत 3 पट आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.