रोजगार वाढणार...सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटी रुपयांची योजना !

    01-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली,
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (budget 23-24)  यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. रोजगार निर्मिती लक्षात घेऊन सरकारने भांडवली खर्चात वाढ केली आहे.
 

ererer 
 
 
सरकारने आपली भांडवली गुंतवणूक 33 टक्क्यांनी वाढवून 10 लाख कोटी रुपये (budget 23-24) करण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम देशातील रस्ते, महामार्ग ते रेल्वे आणि विमानतळांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा सरकारने अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणूक वाढवली आहे. हे देशाच्या जीडीपीच्या 3.3 टक्के इतके आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेने सभागृहात मोदी-मोदीच्या घोषणांनी गुंजले. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेली ही अर्थसंकल्पीय तरतूद 2019-20 च्या तुलनेत 3 पट आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
शेवटचे बजेट
2015 मध्ये सरकारने भांडवली खर्चात 35.4 टक्के वाढ केली. ते सुमारे 7.5 लाख कोटी रुपये (budget 23-24)  होते. ही रक्कम पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, रस्ते, रेल्वे, बंदर आणि विमानतळांच्या बांधकामासाठी निश्चित करण्यात आली होती. यावेळी सरकारने भारतीय रेल्वे मंत्रालयासाठी 2.40 लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. गेल्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाला 1,40,367.14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी 15,710.44 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. देशातील प्रत्येक घरात पाईपद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल जीवन अभियान सुरू करण्यात आले. गेल्या अर्थसंकल्पात यासाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.