विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल लायब्ररीसह अनेक सुविधांची भेट !

01 Feb 2023 12:46:51
नवी दिल्ली,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  digital library for students  यांनी बुधवारी संसदेत 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण क्षेत्रात नवी भेट दिली आहे.
 

erererer 
 
 
निर्मला सीतारामन  digital library for students  यांनी भारतातील तरुणांसाठी करिअर आणि शिक्षण क्षेत्रात बहुआयामी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसदेत घोषणा केली. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याच्या सरकारच्या योजनेची माहिती त्यांनी दिली. डिजिटल लायब्ररी अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणातील दर्जेदार पुस्तके उपलब्ध होण्यासाठी डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश दिला जाईल. डिजिटल लायब्ररीची योजना लागू करण्यासाठी, सर्व राज्यांतील पंचायती आणि प्रभागांमध्ये भौतिक ग्रंथालये स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. या अंतर्गत राज्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल. याशिवाय, सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल शाळा
बुधवारी संसद भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन  digital library for students यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 मध्ये शिक्षण क्षेत्रात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवण्यासाठी यावर विशेष भर दिला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये पुढील तीन वर्षांत केंद्र सरकार ३.५ लाख आदिवासी विद्यार्थ्यांचे उत्तम शिक्षण आणि काळजी घेण्यासाठी एकूण ७४० शाळांमध्ये ३८,८०० शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
Powered By Sangraha 9.0