हिऱ्याचा हार... 17 तोळे सोने आणि नववधू फरार!

    01-Feb-2023
Total Views |
चंदिगढ,  
हरियाणातील रेवाडीतून एक धक्कादायक bride absconded घटना समोर आली आहे. जिथे लग्नाच्या ४ दिवसानंतर वधू सासरच्या घरातून गायब झाली. वधूचा नवरा कॉलेजमध्ये पेपर आणण्यासाठी गेला होता, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून ती घरी परतली नाही. सासरच्यांनी घराची झडती घेतली असता एक हिऱ्याचा सेट आणि 17 तोळे सोने गायब असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पतीने मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
 
 
xg
 
मिळालेल्या माहितीनुसार, bride absconded रेवाडी शहरातील शक्तीनगर येथील रहिवासी अजय कुमारचा विवाह 4 दिवसांपूर्वी 26 जानेवारी रोजी धारुहेराच्या रामनगर कॉलनीत राहणाऱ्या दिव्या नावाच्या मुलीसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. वधूला आणण्यासाठी अजयने धारुहेरा येथील दिव्याच्या घरी लग्नाची मिरवणूकही नेली. दिव्या तीन दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली.  पीडित अजयने सांगितले की, 30 जानेवारी रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास त्याने स्वत: पत्नी दिव्याला शहरातील सेक्टर-18 येथील महिला महाविद्यालयात सोडले होते. दिव्याने सांगितले की तिचा कॉलेजमध्ये पेपर आहे. मात्र सायंकाळपर्यंत दिव्या घरी न पोहोचल्याने तो तिला शोधत कॉलेजला पोहोचला, मात्र तिच्याबद्दल काहीच कळले नाही. मोबाईलवर कॉल केला तर तो बंद झाला.याशिवाय अजय कुमारने सांगितले की, दिव्या रात्रीपर्यंत न सापडल्याने त्यांना संशय आला आणि घरातील सदस्यांनी घर तपासले. त्यामुळे कपाटात ठेवलेला हिऱ्याचा हार व 17 तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अजयने मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.