मेट्रोने वाढविलेले दर त्वरित मागे घ्यावे अन्यथा भाजयुमोचे आंदोलन !

    01-Feb-2023
Total Views |
नागपूर,
मेट्रो प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी तिकीट  (metro travel) दरवाढ केली असली तरी, उत्पन्न तर वाढले नाहीच याउलट मेट्रोची प्रवासीसंख्या आणि उत्पन्न या दोघांमध्येही लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. मेट्रोचे वाढीव दर हे सामान्य नागरिकांना न परवडणारे व त्रासदायक असून ते मागे घेण्यात यावे, अशी विनंती भारतीय जनता युवा मोर्चाने महाव्यवस्थापक, नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना निवेदनाद्वारे केली.
 
 
 
ereererere
 
 
मेट्रो  (metro travel)  ही नागरिकांच्या मदतीसाठी आणि हितासाठी बनविलेली असून, त्याचा उपयोग सामान्य जनता करू शकणार नसेल तर मेट्रोचा फायदा सामान्य जनतेला मिळणार नाही. त्यामुळे मेट्रोला विनंती करण्यात आली की हे दर त्वरित मागे घेण्यात यावे आणि सामान्य जनतेचा विचार करून त्यांना परवडतील असे दर देण्यात यावे किंव्हा दर पूर्ववत करावे. जेणेकरून सामान्य नागरिक याचा फायदा घेऊ शकतील, असेही भाजयुमोने म्हटले आहे. अगोदर जेव्हा नागपूर मेट्रोने सवलतीच्या दरात तिकीट सेवा सुरू केली होती तेव्हा कमीत कमी पाच रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये तिकीट दर आकारले जात होते. मात्र, आता तिकीटदरांची सवलत काढल्यानंतर शून्य ते दोन किलोमीटर अंतर प्रवास करायचा असेल, तर दहा रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. दोन ते 4 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी पंधरा रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. चार ते सहा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट दर लागत आहे. 6 ते 9 किलोमीटर अंतरासाठी दहा रुपयांच्या ऐवजी 25 रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. 9 ते 12 किलोमीटर प्रवासासाठी 30 आणि 12 ते 15 किलोमीटर अंतराच्या प्रवासाला 30 रुपयांचे तिकीट लागत आहे. 15 पेक्षा अधिक किलोमीटर अंतरासाठी सर्वाधिक 35 रुपये खर्च करावे लागत आहेत.
 
18 किलोमीटरपेक्षा  (metro travel) अधिकच्या प्रवासाला 41 रुपये भाडे आकारण्यात येत आहेत. याचा अर्थ असा की, खापरी ते ऑटोमोटिव्ह स्टेशनपर्यंत 41 रुपये खर्च येईल, पूर्वी एवढ्याचं प्रवासासाठी केवळ २० रुपये खर्च येत होता. मेट्रोने मागील दीड ते दोन महिन्यांमध्ये तिकीटांचे दर हे तीन वेळा वाढविले आहे, ज्यामुळे २ लाखांची रायडरशिप कमी होऊन कुठेतरी ९९ हजारांवर आली आहे, याकडेही संघटनेच्या शिष्टमंडळाने मेट्रो प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संघटनेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनीष मेश्राम, मंडळ अध्यक्ष निलेश राऊत, बादल राऊत, सन्नी राऊत, अमर धरमारे, पंकज सोनकर,शेखर कुर्यवंशी, अक्षय ठवकर व अथर्व त्रिवेदी उपस्थित होते.
(सौजन्य:संपर्क मित्र प्रसाद मुजुमदार)