लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळ गडरच्या दुषित पाण्याची दुर्गंधी

01 Feb 2023 14:11:47
नागपूर,
लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळ (Lakshminagar water tank) गडरलाईन चोक झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी मॅनहोलमधून बाहेर पडून भर रस्त्यावर वाहत आहे. लक्ष्मीनगर परिसरात जुन्या इमारती तोडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम, फ्लॅट स्कीमची कामे सुरू आहेत. नवीन इमारती वाढत चालल्या आहेत आणि नागरिकांची संख्या पण वाढत आहे. हा सर्व भार 40 वर्षे जुन्या पाइप लाईनवरच पडत आहे.
 
Lakshminagar water tank
 
लक्ष्मीनगरातील (Lakshminagar water tank) काही जाणकारांच्या मते श्रद्धानंदपेठ ते माटे चौकादरम्यान हॉटेल्सची संख्या खुप वाढली आहे. या हॉटेल्समधून दररोज निघणारा कुजलेला कचरा, शिळ्या अन्नाची विल्हेवाट बरोबर लावली जात नसल्यामुळे व हा कचरा थेट गडर लाईनमध्येच टाकला जात असल्याने दिवसेन्दिवस पाईप लाईन चोक होण्याचे प्रकार वाढले आहेत. पावसाळ्यात कुणाच्या घरातील गडरमधून सांडपाणी केव्हा बाहेर येईल, याची शाश्वती राहिलेली नाही. (Lakshminagar water tank) लक्ष्मीनगर परिसर उपमुख्यमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रात असूनसुद्धा महानगर पालिकेचे येथील समस्यांकडे लक्ष नाही, याबाबत नागरिकांची नाराजी वाढत आहे.
 
- सौजन्य : प्रणय श्रावण पराते, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0