अमरावती,
संत गाडगे बाबा अमरावती Wadegaonkar विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी (स्थानापन्न) जीवतंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 13 (10) नुसार त्यांची निवड केली असून त्यांचा कार्यकाळ प्रभारी कुलगुरूंसोबत किंवा पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.
प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर Wadegaonkar यांची निवड झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि प्राधिकारिणीच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.