आ. कुणावार यांनी केली 215 बालिकांच्या नावाने पहिली गुंतवणूक

- सुकन्या योजनेचा मिळणार लाभ

    11-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
Sukanya Yojana : स्त्रीशक्ती आर्थिक सबलीकरण उपक्रमांतर्गत सरकार तथा डाक विभाग आता आपल्या दारी येऊन सुकन्या समृद्धी योजनेत आ. समीर कुणावार यांनी तालुक्यातील 215 बालिकांचे खाते उघडून या योजनेत सहभागी केले. मोदी सरकारने महिला सबलीकरनाच्या दृष्टीने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना ही बालिकांसाठी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
 
Sukanya Yojana
 
आ.कुणावार यांनी तालुक्यातील गरीब परिवारातील 215 बालिकांना योजनेंतर्गत (Sukanya Yojana) पहिला हप्ता प्रत्येकी 250 रुपये स्वतः जमा केला. गोरगरिबांचे कैवारी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या आ. कुणावार यांनी विधानसभा क्षेत्रातील एकूण 2 हजार तळागाळातील गरीब परिवारातील बालिकांना हा लाभ भेटावा, त्यांचा आर्थिक विकास व्हावा हाच हेतू असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले. मतदासंघातील सर्वच नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. कुणावार यांनी केले आहे.
 
 
आ. कुणावार यांच्या कृष्णाई या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला वर्धा डाक विभागाचे अधीक्षक हरिबाबू वंदना, सहाय्यक अधीक्षक मोहन निकम, अनिता वानखेडे, पत्रकार अभिनय खोपडे, राजेंद्र राठी तसेच डाक विभागाचे श्रीवास्तव, ए. के. पोहाणे, संजय गुजरकर, कृणाल मून, संध्या मोरे, अंकित डंभारे, अक्षय नगराळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तसेच संचलन ए. के. पोहाणे यांनी केले. संध्या मोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी सहाय्यक अधिक्षक मोहन निकम यांनी संपूर्ण सुकन्या समृद्धी योजनेची माहिती दिली.