नागपूर,
Code of Nagpur नागपूर शहराचा STD कोड सध्या 0712 आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने याऐवजी 077 किंवा 070 असा कोड करावा. यामुळे हा कोड छोटा व सुटसुटीत होईल. छोटा कोड असणे हे पर्यटन व्यवसायातील लोकांसह दिल्ली, मुंबईच्या सरकारी ऑफिसेसना सुद्धा संपर्क करायला सोपे आणि सुटसुटीत होईल. याच्यामुळे संपर्क जलदगतीने होईल. संपर्क वाढेल. त्याच्यामुळे व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. नागपूर मोठे शहर होतेय.
याचे महत्त्व वाढतच आहे. तसा संपर्क वाढत आहे. यासाठी छोटा STD कोड होणे हे गरजेचे आहे. त्यामुळे Landline चा वापर वाढू शकेल. BSNL चा महसूल वाढू शकतो. यासोबतच Code of Nagpur नागपूर ( हिंगणा ) एमआयडीसी, बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक व्यवसायात व इतर नागपूर शहराजवळील औद्योगिक भागाचा STD कोड ही नागपूर शहराचाच करावा. यामुळे उद्योगांना संपर्कासाठी फायद्याचे होईल. हे काम नागपूरच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नक्की करू शकतील.
-सौजन्य : बागेश महाजन, संपर्क मित्र