सद्गुरूदास महाराजांचा सत्कार व व्याख्यान 15 रोजी

    12-Feb-2023
Total Views |
गोंदिया, 
Sadgurudas Maharaj : विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदिया व प. पू. विष्णुदास स्वामी महाराज उपासना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दासनवमीनिमित्त 15 फेब्रुवारी रोजी प. पू. श्री विजयराव देशमुख उपाख्य धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांचा सत्कार सोहळा संध्याकाळी 5.30 वाजता भवभूती रंग मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
 
Sadgurudas Maharaj
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांढुर्णा येथील प. पू. ब्रह्मचैतन्य विभूदत्त महाराज सुरेश जोशी उपाख्य काका महाराज राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हनुमानप्रसाद ओझा उपस्थित राहतील. प्रसंगी इतिहासकार असलेल्या प. पू. सद्गुरूदास महाराजांचे ‘शिवसमर्थयोग’ ह्या विषयावरील व्याख्यानाने आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघ आणि विष्णुदास स्वामी महाराज उपासना केंद्रातर्फे करण्यात आले आहे.