मुंबई,
Rakhi Sawant एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे राखीने आदिलवर मारहाण आणि फसवणुकीचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे आता त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. इराणी विद्यार्थ्याने आदिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. राखी सावंतचा पती आदिल खानवर म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलिस ठाण्यात बलात्काराचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इराणी विद्यार्थिनीने आदिलवर म्हैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.