तभा वृत्तसेवा
उमरखेड,
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ (Dr. Anil Kalbande) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वेलफेअर असोसिएशन मलेशियाद्वारे द्वितीय आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन क्वालालंपूर येथे 4 व 5 फेब्रुवारीला पार पडले. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक तथा साहित्य सेवेतील कार्याबद्दल सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, प्रबोधनकार तथा आंबेडकरी विचारवंत डॉ. अनिल काळबांडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Anil Kalbande) आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते. (Dr. Anil Kalbande) मलेशियाच्या केंद्रीय उद्योगमंत्री सरस्वती कंडास्वामी, भारतीय दूतावास तथा मलेशियातील सुभाषचंद्र बोस केंद्राच्या निदेशक राम्या हिरीयन्नैया, ज्येष्ठ समाजसेवी तथा पत्रकार पंजाबमूर्ती, संमेलनाध्यक्ष डॉ. उत्तम अंभोरे, मल्लेश चौगुले, डॉ. प्रकाश करमाडकर, प्राचार्य वैशाली प्रधान, आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा संयोजक डॉ. दीपक खोब्रागडे, सचिव सुजित सुरमाडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संमेलनात परिसंवाद, कवीसंमेलन, नाटकेसुद्धा सादर करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे (Dr. Anil Kalbande) डॉ. अनिल काळबांडे यांना परिसंवाद तथा कवी संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.