धान खरेदीला मुदत, उद्दिष्ट वाढ द्या

- राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    14-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
Paddy Procurement : जिल्ह्यात शासनाच्या हमी भाव योजने अंतर्गत महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या धान खरेदीची उद्दिष्ट व मुदत वाढवून धान उत्पादकांना दिलासा द्यावा. अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Paddy Procurement
 
निवेदनानुसार खरीप हंगामातील धान लागवड व कृषी विभागाने निश्चित केलेले उत्पादन क्षमतेला अनुसरून जिल्ह्याला किमान 50 लाख क्विंटल धान खरेदीचे (Paddy Procurement) उद्दिष्ट अपेक्षित होते. मात्र 39 लाख क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी ई-पीक नोंदणीला मुकले. त्यामुळे अशा शेतकर्‍यांच्या 7/12 अभिलेखावर पीकपेराची नोंद झाली नसल्याने या शेतकर्‍यांना शासकीय हमी भाव केंद्रावर धान विक्री करता आले नाही. परिणामी अशा शेतकर्‍यांनी अल्प दरात धान विक्री करण्याचा प्रसंग ओढवला. धान उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 15 हजार रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहीर करण्यात आला. उत्पन्नाच्या तुलनेत केवळ 375 रुपये प्रति क्विंटल शेतकर्‍यांच्या पदरी पडणार.
 
 
शासनाने एकप्रकारे धान उत्पादकांची थट्टाच केल्याचा आरोपही राजेंद्र जैन यांनी केला. 2 वर्षात रासायनिक खते, किटकनाशके, इंधन, मजुरीचे दर गगणाला भिडले आहेत. शासनाने महागई कमी करावी, धान उत्पादकांना प्रति क्विंटल 1000 रुपये बोनस द्यावे, धान खरेदीची (Paddy Procurement) मुदत व उद्दिष्ट वाढवावे, रखडलेले चुकारे तत्काळ द्यावे, कृषी पंपासाठी दिवसा 12 तास वीज करावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश असूनवरील मागण्यांचे निवेदन आज 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेन्द्र जैन, राकाँचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, केतन तुरकर, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, डॉ. अविनाश काशीवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.