वीज दरवाढीबाबत बसपाचा आक्षेप

15 Feb 2023 17:21:56
नागपूर, 
बहुजन समाज पार्टी (BSP objection) नागपूर जिल्ह्यातर्फे प्रस्तावित 37 टक्के वीज दरवाढीविरोधात मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात आले. दिवसेंदिवस विजेच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे गोरगरीब, कष्टकर्‍यांचे हाल होत असून, सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे.
 
BSP objection
 
वीज नियामक आयोग दरवाढ करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 20 जून 1960 रोजी झाली. 2003 मध्ये भारत सरकारचा विद्युत कायदा लागू झाल्यानंतर 6 जून 2005 रोजी वीज मंडळाचे तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. मनमानी दबावाचे हे तंत्र अवलंबून वीज आयोग वारंवार जनतेचा पैसा लुटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पक्षाने केले आहे. आता पुन्हा वीज मंडळाने वीज नियामक मंडळाला 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला असून, त्यालाच पक्षाचा विरोध आहे. महावितरण कंपनीने दरवाढीचा आणि टोरंटो पॉवर लिमिटेडला खाजगी कंत्राट देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि खाजगीकरण थांबवावे, अशी मागणी (BSP objection) पक्षाने निवेदनामार्फत केली आहे.
 
 
शिष्टमंडळात (BSP objection) बसपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विदर्भ झोन प्रभारी नागोराव जयकर, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, नागपूर शहर प्रभारी ओपुल तामगाडगे, विकास नारायणे, नागपूर शहर उपाध्यक्ष डॉ. अध्यक्ष सुमंत गणवीर, राजेश बडेल या पदाधिकार्‍यांसह सुरेंद्र डोंगरे, सर्फराज अली, हसीन गजभिये आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
 
 
- सौजन्य  देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0