शॉर्टसर्किटने गहू जळून खाक

- शेतकर्‍याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला

    15-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
सालोड (हिरापूर), 
Wheat Burns : विजेच्या खांबावर झालेल्या तारांच्या स्पार्किंगची ठिणगी गव्हात पडल्याने कापणीला आलेला उभा गहू जळून राख झाला. ही घटना सालोड हिरापूर येथील शामपूर शेतशिवारात किशोर झोड यांच्या शेतात आज बुधवार 15 रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. तोंडाशी आलेला घास महावीतरणच्या हलगर्जीपणामुळे हिरावला आहे.
Wheat Burns
 
मिळालेल्या माहितीनुसार किशोर झोड यांची शामपूर शिवारात शेती आहे. खरीपात सोयाबिनची लागवड करण्यात आली होती. मात्र अतिवृष्टीने शेती खरडून गेली. त्यांनी खचून न जाता रब्बीत दोन एकरात गव्हाची लागवड केली. पाण्याचे नियोजन आणि मेहनतीने गव्हाचे पीक फुलवले. सध्या गहू कापणीला आला असून कापणीसाठी जुळवाजुळव करणे सुरू होते. यातच शेतात असलेल्या विजेच्या तारांमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणगी उभ्या गव्हाच्या पिकात पडल्याने पीक जळून राख झाले. जळत असलेला गहू (Wheat Burns) शेतकर्‍यांच्या नजरेत पडताच त्याने आरडाओरडा करून आग विझवण्यासाठी धावाधाव केली. आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात जवळपास पाऊण एकरातील गहू जळून राख झाल्याने शेतकर्‍याचे 25 हजारांचे नुकसान झाले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाल्याने नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍याच्या वतीने करण्यात आली आहे.