ज्वारीचे पीक बहरले

15 Feb 2023 17:40:04
मानोरा, 
खरीप हंगाम वा रब्बी हंगामा मध्ये शेतकरी वन्यप्राण्यामुळे त्रस्त झाल्यामुळे ज्वारी पेरणी (Sorghum Crop) पासुन दुर होत चालला आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकरी घाडस करूण पेरणी करतो, पीक जर बहरले की पीकाकडे पाहुन शेतकरी सुखावतो, बहरलेली ज्वारी येणार्‍या जाणार्‍या लक्ष वेधत आहे.
Sorghum Crop 
 
गेल्या दहा बारा वर्षा पासुन ज्वारी या पिकाची (Sorghum Crop) वन्यप्राणी नासधूस करुण पीके उध्वस्त करत असल्यामुळे ज्वारीची पेरणी करण्यासाठी शेतकरी धजावत नाही. कारण, वन्यप्राण्याच्या त्रासामुळे शेतकर्‍याने ज्वारी व बाजरीची पेरणी बंद केली आहे. रब्बी अथवा खरीप हंगामामध्ये शेतकरी गव्हाची पेरणी मोठया प्रमाणात करत आहे. मात्र, एखादाच शेतकरी ज्वारी पेरणी करतो. मानोरा तालुयातील बोटावर मोजण्या इतया शेतकर्‍यांनी ज्वारीची पेरणी केली असून, सद्यस्थितीत विठोली येथील शेतकरी ज्ञानदेव गाढवे यांनी आपल्या शेतात ज्वारीचे पीक शेतात डौलत असल्याने येणार्‍या जाणार्‍याचे लक्ष वेधत आहे.
 
Powered By Sangraha 9.0