नागपूर,
अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेच्या Saitwal Jain वतीने सैतवाळ जैन समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन नखाते यांनी दिली. अधिवेशनाच्या आयोजनाबाबत ग्रेट नाग रोड, महावीरनगर येथे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. नितीन नखाते यांनी सभेला दिलेल्या माहितीनुसार 15 व 16 एप्रिलला समाजाचे राष्ट्रीय महाधिवेधन नागपूरला होणार आहे. यापूर्वी आळंदी (देवाची) येथे अधिवेशन संपन्न झाले होते. अधिवेशनाला देशभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात सैतवाळ जैन संघटन मंडळ येथून जिनवाणी दिंडी निघणार आहे. अधिवेशनाचे कार्य 6 सत्रात चालेल. त्याची रूपरेषा येत्या काही दिवसात तयार करण्यात येणार आहे. अधिवेशनात उपस्थित राहणार्या प्रतिनिधींची निवास व भोजनाची व्यवस्था नागपुरस्थ समाजाद्वारे करण्यात येईल. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात येणार आहे. नागपूर व विदर्भातील पदाधिकार्यांना महत्त्वपूर्ण जवाबदारी देण्यात येईल. अधिवेशनासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे, राष्ट्रीय महामंत्री मुकुंद वालचाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजयकुमार लुंगाडे व गणमान्य अतिथींना आमंत्रित करण्यात येणार आहे.
श्री सैतवाळ जैन संघटन Saitwal Jain मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे सभेत म्हणाले, युवा कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर महत्त्वपूर्ण जवाबदारी घ्यावी. राष्ट्रीय अधिवेशनाचे अस्थायी कार्यालय श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ, ग्रेट नाग रोड, एस डी हॉस्पिटलजवळ महावीरनगर नागपूर येथे राहील. सभेत पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, श्री दिगंबर जैन युवक मंडळ सैतवाळचे अध्यक्ष विनय सावळकर, महावीर युथ क्लबचे अध्यक्ष दिनेश सावळकर, श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैतवाळ मंदिर संस्थेचे महामंत्री दिलीप राखे, महावीर युथ क्लबचे सचिव प्रशांत मानेकर, अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था पश्चिम नागपूरचे सचिव अरविंद हनवंते, श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष शरद मचाले, बाहुबलीनगर जैन मंदिराचे सचिव सुरेश वरूडकर, अंबानगर जैन मंदिराचे सचिव पद्माकर बुलबुले, प्रतिभा नखाते यांनीही आपले विचार व्यक्त केले. सभेचे संचालन श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाचे कार्यवाह प्रकाश मारवडकर यांनी केले.
(सौजन्य- रमेश उदेपूरकर, संपर्क)