शेतकर्‍याच्या मेहनतीवर रानडुकरांनी फिरविले पाणी

वन प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा

    दिनांक :16-Feb-2023
Total Views |
मानोरा, 
तालुयातील शेती आणि शेतकरी wild boar नैसर्गिक आणि सुलतानी संकटाने वेढलेले असून, हे कमी की काय त्यात वन्य प्राण्यांच्या आक्रमणाचा भर पडून प्रचंड मेहनत आणि खर्च करून शेत शिवारात टाकलेले आणि हाता तोंडाशी आलेले रब्बी पिकांवरही पाणी सोडण्याची पाळी तालुयातील असंख्य शेतकर्‍यांवर येत आहे.
 
FTGRD  
 
 
खरीप हंगामात मौसमी पावसाने wild boar झोडपून काढल्याने तालुयातील सहा मंडळातील बहुतांश शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीला यावर्षी सामोरे जावे लागलेले आहे. अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने खरीपात पिकांची झालेली नुकसान भरपाई रब्बी हंगामातील गहू, हरभरा इत्यादी पिकांच्या लागवडीतून काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकर्‍यांचे प्रयत्न वन्य प्राण्यांच्या झुंडींच्या आक्रमणापुढे तोकडे ठरत आहेत. बेलोरा येथील महिला शेतकरी निता मुंगशीराम उपाध्ये यांच्या जवळपास तीन एकर शेत शिवारातील हरभरा पिकावर जंगली रान डुकरांनी केलेल्या आक्रमणामुळे काढायला आलेले हरभर्‍याचे पीक नुकसान ग्रस्त झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍याच्या तीन एकरातील हरभरा पिकाचा पंचनामा तक्रारीनंतर वन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍याला नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंचक्रोशीतील शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.