गगनम् गगनाकारम् ... श्री गुरुजी !

17 Feb 2023 13:22:20
नागपूर, 
M.S.Golwalkar श्री गुरुजींचे व्यक्तिमत्व अतिशय लोकविलक्षण आणि दिव्य स्वरुपाचे तसेच त्यांचे चरित्र आदर्शवत असल्याचे प्रतिपादन Sanskar Bharati संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य विधा प्रमुख आशुतोष अडोणी यांनी केले. PMG Office पीएमजी ऑफिस स्टाफ को-ऑप. हाऊसिंग सोसायटीतर्फे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक M.S.Golwalkar माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनी आशुतोष अडोणी यांचे व्याख्यान झाले. M.S.Golwalkar संस्थेच्या माधवनगर सभागृहात झालेल्या या व्याख्यानात संस्थेचे अध्यक्ष सुनील बोक्षे व सचिव अतुल गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते.
 

af 
 
प्रारंभी विजय देशपांडे यांनी ‘चाहिये आशिष माधव..' हे गीत सादर केले. M.S.Golwalkar आशुतोष अडोणी आपल्या ओघवत्या व्याख्यानात म्हणाले की, गुरुजींच्या संबंध जीवनचरित्राचे वर्णन ''गगनम् गगनाकारम्'' याच एका श्लोकामध्ये करता येईल. त्यांच्या जीवनकार्याचे आकलन एका व्याख्यानात करणे म्हणजे एका आचमनामध्ये समुद्र प्राशन करण्याचे धारिष्ट्य आहे. M.S.Golwalkar श्रीगुरुजी ज्या एका विशिष्ट तंत्राला घेऊन, या राष्ट्राच्या जागरणासाठी आपल्या आयुष्याची ३३ वर्षे देते झाले, त्या विलक्षण तंत्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
 
 
अडोणी पुढे म्हणाले, अतिशय लोकविलक्षण अशा स्वरुपाचे गुरुजींचे व्यक्तिमत्व होते. M.S.Golwalkar या व्यक्तित्वाला शब्दांमध्ये बांधत, या व्यक्तिमत्वाची शब्द पूजा बांधत असताना नमूद केले पाहिजे की, ३३ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात गुरुजींनी राष्ट्रचिंतन मांडले, संघकार्याची मांडणी केली, संघकार्याचे धुरिणत्व स्वीकारून या राष्ट्राच्या वेदीवर हिंदुत्वाचा विचार प्रतिष्ठित केला. M.S.Golwalkar समोरच्याला प्रभावित करणारे गुरुजींचे विभूतीमत्व होते. आध्यात्मिक, संघटक व राष्ट्रपुरुष हे तीन पैलूू श्री गुरुजींचे सांगता येतील, असे अडोणी म्हणाले. संचालन हेमंत मोहगावकर यांनी केले. M.S.Golwalkar आभार नागेश काणगे यांनी मानले. संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0