उभा ट्रक डांबरी रस्त्यातून जमिनीत फसला

17 Feb 2023 20:32:22
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
Asphalt Road : रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून चालक खानावळमध्ये जेवण करण्यासाठी गेला. जेवण आटोपल्यावर बाहेर येऊन बघितले तर ट्रकची मागची चाके रस्त्यावरून खाली उतरून जमिनीत फसलेली दिसली. ही घटना हिंगणघाट येथे काल गुरुवार 16 रोजी रात्री घडली.
Asphalt Road
 
एम. एच. 40 सी. डी. 7783 क्रमांकाचा ट्रक माल भरून विठोबा चौक परिसरातील जनता खानावळ समोर रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून जेवण करण्यासाठी गेला. जेवण आटोपल्यानंतर चालक परत आला तर त्याला धक्काच बसला. रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक जमिनीत धसल्याचे लक्षात आले. ट्रकला बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. बुलडोजर आणि क्रेनच्या सहाय्याने या ट्रकला बाहर काढण्यात आले. दोन वर्षापूर्वीच या रस्त्याचे निर्माण कार्य झाले आहे. मात्र, ट्रक फसल्याने रस्त्याच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0