आसाम पोलिसांची मोठी एन्काऊंटर

-उत्तरप्रदेश पोलिसांच्या धर्तीवर केली कारवाई

    दिनांक :18-Feb-2023
Total Views |
गुवाहाटी, 
आसाम पोलिसांनी (Assam Police) कामरूप महानगर जिल्ह्यातील सोनापूर भागात एका व्यावसायिकाच्या हत्येतील आरोपीला उत्तरप्रदेश पोलिसांच्या धर्तीवर एन्काऊंटर करून ठाार मारले.
 
Assam Police
 
पोलिस सूत्रानुसार, पश्चिम आसाम दुग्ध उत्पादक सहकारी संघ लिमिटेडचे वितरक रंजीत बोरा यांची 21 नोव्हेंबर 2022 रोजी दुचाकीवरील हल्लेखोरांनी हत्या केली होती. घटनेनंतर (Assam Police) आरोपींनी त्यांच्याजवळील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम पळवून नेली. यातील मु‘य आरोपी शाह आलम तालुकदार याला पकडण्यात आले. तपासाबाबत घटनास्थळी नेत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पुन्हा ताब्यात घेत असताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.