हिंदू धर्म कळला नाही, सावरकर कसे कळणार

अभिनेते शरद पोंक्षे यांची भूमिका

    दिनांक :18-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुणे, 
आम्हाला धर्म संकल्पना कळली नाही, (Sharad Ponkshe) हिंदू धर्म अजून कळला नाही; मग सावरकर कसे कळणार? हिंदू धर्माइतका सुंदर धर्म नाही, हे आम्हाला कधी करणार? धर्म म्हणजे गुणधर्म. आपल्या धर्माचा मूळ गुणधर्म आहे माणुसकी. हिंदू धर्मात भावना आहेत, इतर धर्मात नाहीत. या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व झाले तरच आपण विश्वगुरू होऊ शकतो. सिंधू नदीच्या काठी राहणारे म्हणून आपण हिंदू; पण आता आपली ओळख असलेली सिंधू आपल्या देशात नाही, असे विचार (Sharad Ponkshe) अभिनेते शरद पोंक्षे यांनी योगी अरविंद सांस्कृतिक मंचाच्या व्या‘यानमालेत मांडले.
 
Sharad Ponkshe
 
27 वर्षे शिक्षा भोगून 54 या वयात सावरकर मोकळे झाले, तोपर्यंत तुरुंगात सडत राहिले. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीरांना कैदी कमी करायचे म्हणून एका कारागृहातून दुसरीकडे हलवले, शेवटी घरात स्थानबद्ध केले, असे ते म्हणाले. अस्पृश्यता निवारणाचे अध्वर्यू खरे तर सावरकर होते. मात्र, आपण फक्त फुले व आंबेडकर नावे घेतो. सावरकर मोठे, कारण त्या काळात महार, मांग, लोहार, चांभार हे एकमेकांत रोटी-बेटी व्यवहार करीत नसत. हे सावरकरांनी सुरू केले, पण आजच्या राजकारणी मंडळींनी त्यांना ब्राह्मण जातीत कोंडले. सावरकर समरसता जगले, ते त्यावर कोरडी भाषणे करीत फिरले नाही. व्यवस्थेच्या विरुद्ध बोलायला लागणारी ताकद त्यांच्यात होती. मंदिरे बांधून भंगी माणसाकडून पूजा करून घेतली. सावरकर यांनी ज्यांचा हात धरला, ते आज उच्चवर्णीय लोकांना का शिव्या घालतात, सावरकर फक्त स्वातंत्र्याचा लढा लढले नाही, ते जगातील जातींचा लढा लढले, असे (Sharad Ponkshe) पोंक्षे यांनी सांगितले.
 
 
याप्रसंगी रा. स्व. संघाचे पं. महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव यांच्या हस्ते पियूची वही हे गाजलेले पुस्तक लिहिणार्‍या प्रसिद्ध लेखिका डॉ. संगीता बर्वे यांचा सत्कार करण्यात आला. रविवार सायंकाळी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे रा. स्व. संघ व सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यान होणार आहे.