अनन्याश्रीच्या खांद्यावर बिरला ग्रुपची मोठी जबाबदारी

    02-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली,
बिरला ग्रुपचे (Birla Group) चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्याश्री बिरला हिने आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू पसरवली असून, आता लवकरच ती आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक घराण्यांमध्ये तरुण पिढीच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक असलेले कुमार मंगलम बिरला यांनीही त्यांच्या वारसांकडे जबाबदारी सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
 
Birla Group
 
कुमार मंगलम (Birla Group) बिरला यांची मुलगी अनन्याश्री बिरला आणि मुलगा आर्यमन बिरला आता व्यवसायाची नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. कुमार मंगलम बिरला यांनी त्यांची दोन मुले अनन्या आणि आर्यमन विक्रम बिरला यांच्याकडे फॅशन आणि रिटेलची जबाबदारी सोपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. दोन्ही भावंडांचा आदित्य बिरला ग्रुपची कंपनी आदित्य बिरला फॅशन आणि रिटेल लिमिटेडच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. दोघेही कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम करतील.
 
अनन्याश्री बिर्ला यांच्या गाण्यांना प्रसिद्धी
कुमार मंगलम बिरला (Birla Group) यांची मुलगी अनन्याश्री बिरला 28 वर्षांची आहे. व्यवसायाची जाण असण्यासोबतच गायिका म्हणूनही तिची ओळख आहे. अनन्याने इंग्रजी भाषेत गायलेल्या 5 सिंगल गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अनन्या बिरला यांना आधीपासूनच व्यवसायाची समज आहे. वयाच्या 17 व्या वर्षापासून ती मायक्रो फायनान्स कंपनी चालवत आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील महिलांना छोटे कर्ज देण्याचे काम करते. यासोबतच अनन्याला बिझनेस जगतात एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ओळखले जाते. इतकंच नाही तर अनन्याश्री बिरला 'इकाई असाई' या डिझाईन होम डेकोर ब्रँडच्या संस्थापक आहेत.