इतस्तत:
- प्रा. दिलीप जोशी
Shri Suktam श्रीसूक्ताविषयी भारतीय मनात विशेष आकर्षण आहे. या सूक्ताने कुंकुमार्चन, आवर्तन करून धनसंपत्तीसाठी सर्व जण साधना करतात. विशेषत: स्त्रीवर्गामध्ये तर याविषयी खूप श्रद्धाभाव आहे. Shri Suktam आपली धर्मरचना शिव आणि शक्तीवर आधारित आहे. शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही. शक्ती हे मातृतत्त्व आहे. ख-या अर्थाने शक्ती ही जननी आहे. त्यालाच जन्मदात्री म्हणतात. श्रीसूक्ताचा विग्रह केला तर श्री आणि सूक्त असे दोन शब्द आहेत. Shri Suktam श्रीसूक्तात श्री म्हणजे केवळ अर्थलक्ष्मी, धनसंपत्ती, पैसा असा भाव आपण ठेवतो आणि इथेच गडबड होते. खरे तर ‘श्री'ला व्यापक अर्थ आहे. ‘श्री' म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीच त्रिगुणात्मिका जगदंबा, तीच रेणुका, तुळजाभवानी आणि तीच परमेश्वराची आद्याशक्ती आणि सूक्त म्हणजे स्तुती. त्या आदिमाया शक्तीची स्तुती म्हणजेच Shri Suktam श्रीसूक्त. ऋग्वेदात एकूण दहा मंडले आणि १०३२ सूक्ते आहेत. याशिवाय काही जादा सूक्ते म्हणजे पुरवणी सूक्ते आहेत. शास्त्रात त्यांना खिलसूक्ते म्हणतात. ऋग्वेदातील ५ व्या मंडलात एकूण ८७ सूक्ते आहेत. याच मंडलात अत्यंत लोकप्रिय असे विशेष खिलसूक्त म्हणजे जादा सूक्त किंवा पुरवणी सूक्त आहे. त्याचे नाव श्रीसूक्त Shri Suktam !

Shri Suktam कधी कधी मूळ वृत्तपत्रापेक्षा पुरवणी महत्त्वाची ठरते. त्याप्रमाणेच ऋग्वेदातील मूळ सूक्तापेक्षा श्रीसूक्त Shri Suktam नावाचे पुरवणी सूक्त महत्त्वाचे ठरते. श्री म्हणजे अंतरंगाचे सौंदर्य. ते जाणीवपूर्वक धारण करता यावे. श्रींची दोन रूपे आहेत. परा शक्ती आणि अपरा शक्ती. अपरा ही प्रकट शक्ती आहे. तिलाच बहिरंग शक्ती म्हणतात. Shri Suktam पण परा शक्ती ही अंतरंग शक्ती आहे. तिचे जागरण म्हणजे श्री जागर होय. म्हणूनच श्रीमान, श्रीमती लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे अंतरंगाचे सौंदर्य असणारा किंवा असणारी. आद्य शंकराचार्यांनी सौंदर्यलहरीमध्ये ‘श्री' ची दशरूपे सांगितली आहेत. Shri Suktam महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, वल्गामुखी (बगलामुखी), मातंगी, कमला ही दशरूपे आहेत. सप्तशतीमध्ये तिची नवरूपे सांगितली आहेत. Shri Suktam शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघन्टा, कुष्मांड, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री ही ती रूपे सर्वज्ञात आहेत. देवी भागवतामध्ये तिची लक्ष्मी स्वरूपात आठ रूपे म्हणजे वीर, गजान्त, संतान, विजय, धान्य, आदि, ऐश्वर्य आणि धनलक्ष्मी ही रूपे सांगितली आहेत, तर पुराणात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही प्रधान तीन रूपे सांगितली आहेत. Shri Suktam
आपण मात्र ‘श्री' म्हणजे केवळ पैसा आणि तोही पै-पै गोळा करणे असे समजतो. म्हणूनच आज काही महत्त्वपूर्ण बाबी आपणासमोर चर्चिणार आहे. साधारणतः गत एक तपापासून प्रस्तुत लेखक यावर संशोधन करीत आहे. श्रीसूक्ताचे एवढे वर्णन सर्वत्र आहे, तर ते निश्चितच फलदायी असलेच पाहिजे. Shri Suktam फळ मिळत नसेल तर एक तर आपण चूक किंवा श्रीसूक्त चूक. पण ज्याअर्थी ते वैदिक आणि प्राचीन ऋषी-मुनींनी सांगितले, त्या अर्थी ते शाश्वत सत्य आहेच. याचा अर्थ कुठेतरी आपणच चुकतो. त्यावर शोध आवश्यक म्हणून मग मी श्रीसूक्त रोज शेकडो वेळा आवर्तनित केलं. Shri Suktam मला रोज ‘नित्यनूतन देखिजे श्रीसूक्त' हे लक्षात आले. रोज नवे अर्थ आणि मार्ग दिसू लागले. त्यातून मला फलदायी पद्धत सापडली. Shri Suktam लाखो लोक श्रीसूक्त म्हणतात. पण फळ मिळत नाही. कारण त्यांची पद्धत चुकीची आहे, असे माझे मत आहे. कार्य कोणतेही असो त्याची अचूक पद्धत असेल तरच फळ मिळेल. Shri Suktam समजा चहा करायचा आहे तर त्याची विशिष्ट पद्धत वापरली तरच पिण्यायोग्य चहा मिळेल. तसेच श्रीसूक्ताचे आहे. त्या पद्धतीचा वापर केला तर तिला फळ द्यावेच लागेल.
श्रीसूक्त नीट वाचा. Shri Suktam गद्यात असले तरी ते पद्यात वाचा. मग लक्षात येईल, काय आहे असे श्रीसूक्तात की परिणाम दिसतोच? आता त्यावर विचार करू. Shri Suktam श्रीसूक्ताची देवता आहे जातवेद नावाची अग्नी. याचा उल्लेख श्रीसूक्तात चार वेळा आहे. जातवेद अग्नी हा यज्ञाग्नी म्हणजेच यज्ञस्थळी प्रकट होणारा अग्नी आहे. Shri Suktam ऋग्वेदात जवळजवळ २०० च्या वर अग्नीची सूक्ते आहेत. हा जातवेद अग्नी श्री आणि मनुष्य यांना जोडणारा सेतू आहे. एका अर्थाने श्री चे स्वीय सहायक आहे. त्याच्याशिवाय ‘श्री'पर्यंत जाणे जरा कठीणच. Shri Suktam हे श्रीसूक्त स्पष्टच सांगते, ‘जातवेदो म आवह' गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. श्री महालक्ष्मीचे चार पुत्र आहेत. १) आनंद २) कर्दम ३) श्रीद ४) चिक्लित या चार पुत्रांसाठी श्रीसूक्तात वारंवार प्रार्थना आहे की, तुम्ही श्रीपुत्र आहात, तुम्ही आमच्या घरात या. लेकराच्या मागे आई येतेच येते. Shri Suktam म्हणून त्यांना पाचारण केले आहे. कर्दमेन प्रजा भूतां किंवा चिक्लित वसमे गृहे या ऋचा हे स्पष्टच करतात. आनंद म्हणजे परमानन्द, कर्दम म्हणजे कमळ, श्रीद म्हणजे साक्षात कुबेर आणि चिक्लित म्हणजे टवटवीत, ताजातवाना. Shri Suktam हे सारे घरात असेल तर आरोग्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी आपोआप आहेतच. तेथे भाग्यासी काय उणे?
Shri Suktam श्रीसूक्तात देवसखा कुबेर भगवंताला प्रार्थना आहे- तुम्हीही या माझ्या घरात आणि तेही कीर्ती चिंतामणीसह. उपैतु मां देवसख: ही ऋचा हेच इंगित करते. कुबेराची दखल घेणे म्हणजे कुबेर आपल्या घरात निवासी बोलावणे होय. श्रीसूक्तात श्रीफळ म्हणजे बेलफळ आहे. आपण श्रीफळ म्हणजे नारळ समजतो, पण शास्त्रात श्रीफळ म्हणजे बिल्वफळ आहे. Shri Suktam त्या फळाला आपण विसरतो. श्रीसूक्त सुरू करण्यापूर्वी बिल्वफळ पूजले पाहिजे. कारण, हे फळ श्रीच्या तपश्चर्येतून उत्पन्न झाले आहे. श्रीफळ कायम घरात ठेवून पाहा. याच श्रीसूक्तात अश्व आणि गज याचा उल्लेख आहे. गजान्त लक्ष्मीचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणून श्रीसूक्ताची अर्चना सुरू करण्यापूर्वी हत्तीचे ध्यान महत्त्वाचे. ज्या-ज्या संस्थानात हत्ती आहे, तेथे अखंड लक्ष्मी कायम निवासी आहे. Shri Suktam श्रीसूक्ताचा प्रयोग करताना कमळपुष्प वापरले पाहिजे. कारण ती ‘पद्मेस्थिताम् आहे. खर तर कमळ म्हणजेच श्रीदेवी, चिद्शक्ती, निरंतरता, शुचित्व, आत्मविद्या. कमळ म्हणजे सहस्राधार. मूलाधार ते सहस्रधार साधनशुचिता. तोच विवेक प्रसवतो. श्रीसूक्त आराधनेत धर्मदंड पूजनही अतिआवश्यक आहे. शास्त्रात त्याला यष्टी म्हटले आहे.
याशिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठाम्अलक्ष्मी: असे जिचे वर्णन श्रीसूक्तात आहे, ती आपल्या घरात अवदसा आणि अवकळा आणते. Shri Suktam तिच्याबाबत दखलपात्रता स्वीकारली आहे. म्हणजे तिची दखल घेणे आवश्यक आहे. तिला बाहेर काढण्यासाठी तिला प्रथम वंदन करायला हवे. अभुतिम असमृद्धीन्च सर्वा निर्नुदमे गृहात. इथे अवदसा आणि अवकळा घरातून घालवावे, असा उल्लेख आहे. याशिवाय क्षुत्पिपासा म्हणजे तहान आणि भूक यांच्या भस्म्या वृत्तीचा नाश, ही अलक्ष्मी घरातून घालविली तर होतो. Shri Suktam त्यामुळे अलक्ष्मीला सन्मानपूर्वक घरातून घालविणे आवश्यक आहे. या सर्वांची दखल घेतल्यावर मग त्या श्रीची आर्त प्रार्थना आहे. आपण या सर्वांना ओलांडून अर्थात दुर्लक्ष करून पुढे जातो आणि मग आपली साधना फलित होत नाही अन् मग अविश्वासाचे मळभ सुरू होते. Shri Suktam श्रीसूक्त आराधना क्रमवार आणि योग्य पद्धतीने केली तर श्रीसूक्ताने ऐश्वर्य प्राप्त होते किंवा ऐश्वर्यविषयक विवेक उत्पन्न होतोच होतो. ऐश्वर्य म्हणजे समजा मला नेहमीच स्वतःच्या चारचाकी वाहनाने जाण्याची इच्छा आहे. Shri Suktam ती पूर्ण होणे म्हणजे ती गाडी माझ्या मालकीची असणे.
Shri Suktam ही झाली ऐश्वर्य प्राप्ती आणि ऐश्वर्यविषयक विवेक म्हणजे परिवहन मंडळाच्या बसनेदेखील मला तोच आनंद येणे. दोन्हीतही सुख सारखेच असणे. श्रीसूक्त पठनाने अशी विवेकबुद्धी निश्चित प्राप्त होते. वाममार्गाने आलेली लक्ष्मी वाममार्गानेच जाते, याची वारंवार अनुभूती झाली की आपोआपच इष्टमार्ग सापडतो आणि ऐश्वर्यविषयक विवेक उत्पन्न होतो. यात उपासना मंत्रासाठी अनुष्टुप छंद आहे. Shri Suktam ज्यामुळे चित्ताची चंचलता नाहीशी होते. हृदय उदार आणि विशाल होते. विवेक आणि संयम यांचे मनात बहुमत निर्माण होते. ही श्रीसूक्त साधना करताना सांगितली ती पद्धत, Shri Suktam मार्ग त्यासोबत श्रीयंत्र आणि जोडीला ललितासहस्रनाम घेतले तर यंत्र, मंत्र आणि तंत्र यांच्या समन्वयाने प्रचंड आणि अवाक् करणारी फळे दिसतात. श्रीसूक्त हे प्रभावी आणि फलदायी सूक्त आहे. Shri Suktam यामुळे ऐश्वर्य किंवा ऐश्वर्यविषयक विवेक हमखास प्राप्त होतो.
९८२२२६२७३५