बाबा जुमदेवजी यांचे कार्य मोलाचे-राजेंद्र जैन

20 Feb 2023 18:17:04
गोंदिया, 
व्यसनमुक्त समाज घडविण्यात Baba Jumdevji महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य मोलाचे आहे. परमात्मा एक सेवक मंडळ बाबा जुमदेव यांचे कार्य पुढे नेत आहेत. व्यसनमुक्त समाज घडविण्यात या मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याच बरोबर वर्षानुवर्षापासून रुजलेल्या अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथेचे निर्मूलन करण्याचे कामही या मंडळाच्या वतीने झाले आहे. खर्‍या अर्थाने मानव धर्म व समाज निर्मितीमध्ये परमात्मा एक सेवक मंडळ फार पुढे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
 
dssf
 
 
तालुक्यातील सेजगाव येथे Baba Jumdevji परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या गोंदिया शाखेच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात ते बोलत होते. यावेळी केतन तुरकर, नितीन टेंभरे, सुनिल पटले, रामेश्वर चौरागडे, मुनेश्वर कावडे, मुकेश बारेवार, धनेश्वर कावडे, अनिल खरोले, गोपाल बिसेन, योगी येडे, लालचंद बिसेन, जयेंद्र बागडे, अंकुश बर्वे, तुळशीदास बिसेन, रमेश कावळे, गेंदलाल पटले, पदमसिंह नेवारे, अशोक बिसेन, मंगल बागडे, सोनू कावळे, विठ्ठल कावडे, खिलेश बिसेन, गोविंद बिसेन, बंडू सोनवणे, सियाराम बिसेन, राजकुमार गौधरे, कुवरलाल गौधरे, अजितलाल बिसेन, राधेश्याम बिसेन, शोभेलाल खरोले, छबिलाल ठाकरे सहित परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0